Home Breaking News राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आंधळी येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत आंधळी येथे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

220 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, : ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधी चर्चा
सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती माण यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा संबंधीचे गण स्तरावरील ग्रा.पं.सदस्य ग्राम संसाधन गट व शासकीय कर्मचारी यांची एक दिवसीय कार्यशाळा आंधळे येथे संपन्न झाली. या एक दिवसीय कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी आर.पी.भोईटे आंधळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबासो पवार, माण पंचायत समिती सभापती कविता जगदाळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चिटणीस दादासाहेब काळे, आदीं नी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
    या कार्यशाळेमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील मिळणाऱ्या 15 वा वित्त आयोगातील निधी तसेच ग्रामपंचायत विकास आराखडा कशा प्रकारे तयार करायचा व कोणत्या कामांना प्राधान्य द्यायचे विकास आराखडा मंजूर कशाप्रकारे केला जातो यासंबंधी माहिती देण्यात आली.
    या एक दिवशीय कार्यशाळेसाठी आंधळी गणातील सर्व ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी आशा सेविका, प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.