
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : गेल्या दोन ते तिन महिन्यापासून जिवती तालुक्यातील अनेक गावामध्ये चिकनगुण्या या रोगाने थैमान घातली असून यात विशेषता आनंदगुडा, शंकरपठार, चिखली, कोलामगुडा, पिट्टीगुडा, गोंडगुडा, या सारख्या अनेक गावामध्ये या आजाराने लोक त्रस्त आहेत.या आजारात तीव्र ताप, गुडघेदुःखी,हातपाय दुःखी , मानपाठ दुःखी, सांधे दुःखी ची लक्षण आहेत. हा आजार जर कुटूंबात एकाला झाला तर संपूर्ण कुटुंबाला होत असल्याचे दिसत आहे. कारण या आजाराने एका कुटूंबात तीन ते चार व्यक्तीं असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकाद्या गावात जर हा आजार झाला तर संपूर्ण गावाला होत असल्याचे भयावह चित्र दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या बिमारी संबंधातील तक्रारी आम आदमी पार्टी कडे आल्या या बाबीचा विचार करून आम आदमी पक्षाचे तालुका सचिव श्री. गोविंद गोरे यांनी आपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ता याना घेऊनअनेक गावांना भेट देऊन चिकनगुण्या ग्रस्त लोकांशी भेट घेऊन प्रत्यक्ष समस्या जाणून घेतल्या. त्यात त्यांना तालुक्यातील चिकनगुण्या ग्रस्त लोकांकडून वेगवेगळ्या समस्या ऐकायला मिळाल्या. सद्या तालुक्यात कापूस वेचनी चे सीजन सुरू असून मजूर मिळत नसल्याने अनेक शेतकरी वर्ग चिंता करत असताना अशातच चिकनगुण्याने अधीकच संकटात भर पडल्याने सर्व शेतकरी वर्ग सुरवातीला अतिवृष्टी ने आणि आता कापूस वेचंनी साठी मंजूर मिळत नाहीत या दुहेरी संकटात सापडला असताना आता चिकनगुण्या येऊन संपूर्ण कुटुंबंच जर चिकनगुण्या ग्रस्त झालं तर कस व्हायचं या चिंतेने तिहेरी संकटात सापडला असल्याचे चित्र दिसलें. याच बाबीचा विचार करून प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे आम आदमी पक्षाकडून निवेदन देण्यात आले. यात लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली येत्या चार ते पाच दिवसात उपाययोजना झाली नाही तर आम आदमी पार्टी जनतेला सोबत घेऊन तिव्र आंदोलन करेल. याप्रसंगी पक्षाचे तालुका आध्यक्ष श्री. मारूती पुरी पक्ष सचिव श्री. गोविंद ग पक्षसहसंयोजक श्री. सुनील राठोड तथा ईतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

