
जांमनी परिसरात राहणाऱ्या मुलीला फूस लावून पळून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात दाखल केली.
वडिलांच्या म्हणण्यानुसार ही १७ वर्षीय मुलगी रविवार दि. १५ रोजी रात्री ९.३० पर्यंत घरीच होती. याचवेळी अज्ञात युवकाने तिला घराबाहेर बोलावले व फूस लावून पळून नेले. मुलगी घरी न परतल्यानंतर तिची शोधाशोध सुरू केली. मात्र शेवटी मुलीच्या वडिलांनी तक्रार नोंदवली. मागील १० दिवसात दोन अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या घटना घडलेल्या आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

