Home Breaking News विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टलच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टलच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

118 views
0
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर – विदर्भ वतन वृत्तपत्र तथा न्युज पोर्टलच्यावतीने दरवर्षी दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात येते़ यंदाचे हे पाचवे वर्ष आहे़ महाराष्ट्रातील नामवंत साहित्यीकांचे लेख, ललित, कथा, कवितांचा यात समावेश आहे़ यंदाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर महाराष्ट्रीय पेहरावातील उत्तम छायाचित्र अभिनेत्री अश्विनी गोरले यांचे प्रसिद्ध करण्यात आले असून दिवाळी अंक ‘दीपोत्सव-२०२०’ चे सर्वांनी कौतूक केले़ दिवाळी अंकाचे प्रकाशन विदर्भ वतन कार्यालयात पार पडले़ यावेळी विदर्भ वतन वृत्तपत्राचे मुख्य संपादक गोपाल कडुकर, मुखपृष्ठ छायाचित्र असलेल्या अभिनेत्री अश्विनी गोरले, अक्षरक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच लेखक शंकर घोरसे, लेखक राजेश वैरागडे, पत्रकार संजय मुंदलकर, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक संजय भुजाडे, उद्धव वाटकर, भाग्यलता तळखंडे तसेच विदर्भ वतन परिवारातील गिता जाधव, नरेंद्र डोये, पंकज जिचकार, रामचंद्र थेरे यांच्यासह हितचिंतक उपस्थित होते़