क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची १४५ वी जयंती साजरी….. 

328
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल,
उत्तर नागपूर येथील जरीपटका मध्ये रॉयल गोंडवाना आदिवासी विकास विकास संघातर्फे दि. १५ नोव्हेंबर २०२० ला क्रांतीसुर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या १४५ व्या जयंती निमित्य रॉयल गोंडवाना आदिवासी विकास युवासंघ संस्था जरीपटका यांच्या तर्फे मोठया उत्साहाने जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.आकाश मडावी विदर्भ युवा महासचिव (अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली) यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी किशन मरसकोल्हे, गौरव मरसकोल्हे, पुजा मरसकोल्हे, ज्योती मरसकोल्हे , रामसिंग मरसकोल्हे, पृथ्वीराज धुर्वे, सुनंदा धुर्वे, पुनाराम किरनाके, आशा किरनाके, आशुपाल भलावी, अभिषेक सलामे, सौरभ मरकाम, काजल अहाके, किशोर मरसकोल्हे, अभय साखरे, विनोद मेश्राम, यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला विशेष उपस्तिथि म्हणुन संघटनेचे पदाधिकारी निलेश धुर्वे, प्रवीण श्रीरामे, प्रकाश इवनाते, नितेश धुर्वे, प्रतीक मडावी, दादू मडावी, कार्यक्रमाला उपस्तिथ होते. आभार प्रदर्शन किशन मरसकोल्हे यांनी  मानले.