Home Breaking News श्रीराम फायनान्स च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे वाहतूक धारकांच्या समस्या बाबत...

श्रीराम फायनान्स च्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे वाहतूक धारकांच्या समस्या बाबत निवेदन

169 views
0
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर :
वाहन कर्ज क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्सच्या नागपूर  येथील कार्यालयात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि करोना संकटकाळात उद्ध्वस्त झालेल्या वाहतूक व्यावसायिकांना दिलासा देण्याबाबत आग्रही मागण्या केल्या. “तुम्हाला जे काही करायचं असेल ते कायद्याच्या कक्षेत करा, कायद्याची मर्यादा ओलांडू नका” अशा शब्दांत श्रीराम फायनान्सला मनसे ‘समज’ दिली. मनसेच्या या शिष्टमंडळात श्री. हेमंत भाऊ गडकरी (सरचिटणीस ) सचिन भाऊ धोटे (जिल्हा अध्यक्ष) अजय भाऊ ढोके (शहर अध्यक्ष ) मंगेश शिंदे (शहर अध्यक्ष ) प्रशांत निकम (उप शहर अध्यक्ष ) गजानन भाऊ टिपले(जिल्हा उपाध्यक्ष )  यांचा समावेश होता. तसेच देवेंद्र जैन, विपीन धोटे, अमर भारद्वाज, प्रभुदास डोंगरे, सुजित मधुमटके, गुड्डू भाऊ मिश्रा, युवराज तळेगावकर, प्रवीण गायकवाड,शाहिद पटेल, योगेश भाऊ चौरसिया,हरिओम काटंकर, अजय मोडकर, बागडे गुरुजी, अंकुश शिंदे आदी,  महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अनेक पदाधिकारी- कार्यकर्ते यांनी याप्रसंगी उपस्थित असून  मोलाचं सहकार्य केलं.
श्रीराम फायनान्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर देण्याचं आश्वासन दिलं आहे.
आपणास माहित आहे की, कोरोना 19 या महामारीमुळे संपूर्ण देशात सरकारने लाॅकडाऊन घोषित कले होते, त्यामुळे संपूर्ण लोकांचे व्यवसाय ठप्प झाले होते. त्याचप्रमाणे वाहतूक व्यवासय पण पूर्णपणे बंद होते. या गोष्टीची आपणास नक्कीच जाणिव असेल. आपल्या शहरात ब-याच वाहनधारकांनी आपल्या संस्थेचे वाहनावर कर्ज घेतलेले आहेत, या अचानकपणे उभ्दवलेल्या महामारीमुळे वाहनधारक आपल्या कर्जाचे मासिक हप्त्ते नियमितपणे भरू शकलेले नाही आणि आज पण काही वाहनधारक ते भरण्यास असमर्थ परिस्थितीत आहेत, त्यांचे व्यवसाय आता सुरळीत सुरू होण्यास सुरवात होत आहे. परंतु आपल्या कर्जाचे मासिक हप्त्ते नियमित न भरल्यामुळे आपल्याकडून वाहनधारकांचे वाहन जप्त करण्यात येत आहे त्याचप्रमाणे त्यांना आपल्या वसुली पथकाद्वारे अपमानास्पद असभ्य वागणूक, आणि भ्रमणध्वनी वर धमकाविणे हा प्रकार दिवसेदिवस वाढत चालला आहे. यातून वाहनधारकांचे मानसिक खच्चींकरण करणे चालू आहे त्यामुळे भविष्यात विध्वंसक परिथिती निर्माण होऊ शकते हि खुब मोठी गंभीर बाब आहे व याचे भान असण हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे वाहनधारकांचे मनोबल खचत असून जागावं की मरवं ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
आपणास असे वाटत असेल की या वाहनधारकांच्या पाठीशी कुणी नाही, हा तुमचा गैरसमज आहे, अशा वाईट परिस्थितीत असलेल्या प्रत्तेक वाहनधारकांच्या पाठीशी मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशन्वे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना खंभीरपणे उभी आहे. त्यामुळे आपणास या आक्रोश निवेदनाद्वारे तंबी देण्यात येते की, वरील वाहनधारकानसोबत होणा-या गैरकृत्य कदापि सहन केल्या जाणार नाही त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून या विषयावर शिक्कामोर्तब कराव अन्यथा तीव्रसवरूपाचे आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे या वाईट वेळेत त्या वाहनधारकांचे मनोबल वाढेल आणि तुमचे राहालेले मासिक हप्ते नियमित भरतील असे कार्य आपले कडून घडावे एवढी अपेक्षा आम्ही आपल्या कडून करू इच्छितो ही विनंती.