दीप अंतरीचा

272
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल,
नको तू समजू
स्वतःस दुबळा
प्रयत्नाने भेद
तिमिर सगळा
जातीने स्वतःच्या
क्षमतांना जाण
विकास करण्या
ओत पंचप्राण
तुझ्याच नशिबी
अंधाराच्या वाटा
सातत्याने चाल
मिळे यश फाटा
निराशा सागर
भोवताली सारा
आशेचा हो स्वार
गाट तो किनारा
दीप अंतरीचा
पेटू दे रे असा
अशांत  समुद्र
उधानतो तसा
यत्न हे पाहता
देवही लाजेल
तुज जीवनाचे
मंदिर सजेल