आली आली दिवाळी…

263
विदर्भ वतन न्युज पोर्टल,
म्हणता म्हणता ही आली दिवाळी
आठवणीत रमल्या या लेकीबाळी
लगबग कैसी ती सडा सारवणाची
मज्जा भारी वाटे रंगीत रांगोळीची
खमंग फराळ नि गोडधोड जेवण
पणत्यांनी सजलेले अवघे अंगण
नवीन कपड्यांची किती नवलाई
घरोघरी चांदण्यांची बघा रोषनाई
जुन्यानव्या मित्रांचा पारावर मेळा
गप्पांतच रंगे इथे आनंद सोहळा
पोरासोरांना तर फार आनंद होई
खेळण्याला किती कसा ऊत येई
कोरोनाचा कोप कैसा धरी धावला
साऱ्यांचाच आनंद हिरावून घेतला
मामाकडे जाणे यंदा होणार कसे
माहेराचे गोकूळ भरणार तरी कसे
संपले नाही पूर्ण कोरोनाचे संकट
घरात राहू आहे परिस्थिती बिकट
करूया साजरा सण घरच्या घरी
फोडुया ना फटाके थोडेथोडे तरी
पणत्या लावुनी सारा उजेड करू
आनंदाचा सर्व ठेवा हृदयात भरू