मामाने बातमीचे खंडन करण्याकरिता पत्रपरिषद घेतली. त्यांच्यावर लावलेले आरोप हे सर्व खोटे आहे. त्यांनी पत्रपरिषद मध्ये वस्तुस्थिती सांगितली.

277

विदर्भ वतन न्युज पोर्टल,
मी देवेंद्र नारायण काटे रा. हिवरीनगर नागपूर. ‘‘मामाच्या नावाची चक्क भाची जावयाला घातला दंडा’’ या सदराखाली दिनांक 09/11/2020 ला वर्तमानपत्रात माझी बदनामी करणारी जी वार्ता प्रसारीत झाली त्याचे खंडन करण्याकरीता मी पत्र परिषद बोलाविली आहे खरी वस्तुस्थिती खालील प्रमाणे माझे वडील श्री नारायण काटे व त्यांचे मोठे भाऊ भास्करराव काटे यांच्या सामायिक मालकीचे हिवरी ले-आउट, नागपूर येथे भुखंड क्र.11 एन.आय.टी. च्या लिलावात घेण्यात आले होते. भास्कररावनी निम्मा भुखंड विकला होता व त्यामुळे उरलेला निम्मा भुखंड माझे वडील श्री नारायणराव काटे यांच्या मालकीचे होता. श्री नारायणराव काटे यांचा निधन दिनांक 15/03/2003 ला झाल्यानंतर मी माझा भाऊ भुपेंद्र व माझ्या चार बहीणी व माझी विधवा आई वारसान हक्काने सहमालक झालो.
आम्ही सर्व सहमालकांनी आमच्या वडीलांचा निम्मा प्लाॅट विकण्याचा सौदा श्री रामानी यांचे सोबत सन 2018 ला केला. तक्रारकर्ता बाळकृश्ण मुलचंद आचार्य हा बेरोजगार असून त्याची पत्नी माझी बहीण सुनंदा हिची मुलगी आहे. बालकृष्ण आचार्य यांनी तिला तो फार श्रीमंत घराण्याचा आणी उच्च पदस्य अधिकारी असल्याचे आमिष दाखवून सन 2006 मधे त्यांनी माझी भाची रंजना हिचे सोबत सन 2005 ते 2006 चे दरम्यान लग्न केले तिने प्रेम विवाह केल्यामुळे आम्ही तिच्याषी समाजात आमची बदनामी झाली या करणाने बोलत नवहतो व संबंध ठेवला नाही.
बालकृष्णमुलचंद अजचार्य याचे जवळ वैद्यकीय उपचार करण्याकरीता आवश्यक लागणारे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही व तरीपण तो नेचर हाॅस्पीटल अॅन्ड रिसर्च इन्स्टीटयुट नावाने खोटी संस्था चालवितो व लोकांना लुबाडतो एवढेच नवहे तर तो त्याची पत्नी रंजना तिच्या माहेरचे नाव रंजना बाळबुधे ला डाॅक्टर रंजना बाळबुधे असे दर्शवून ती चिकीत्सक आहे म्हणून तपासणीसाठी मोठी फी लोकांकडून घेतो.
श्री भास्करराव काटे यांचे वारसान व मी यांचे दरमयान प्लाॅटची वाटणीवरून वाद न्यायालयात सुरू होता त्या दरमयान त्यांचे वारसानांनी निम्मा प्लाॅट विकण्याचा सौदा श्री निंबाळकर व नागपाल नावाचा गृहस्थासोबत केला. एन.आय.टी. च्या नियमाप्रमाणे अर्धा भुखंड सहभुखंड धारकाच्या अनापत्ती पत्राषिवाय विकता येत नाही म्हणून श्री नागपाल व निंबाळकर यांनी आमच्याषी समझौता केला. समझौताकामी बालकृष्ण आचार्य यांनी माझ्यासोबत जातीने हजर राहून पुढाकार घेतला होता. समझौत्यामधे खरेदीदाराने खरेदी किंमती व्यतिरिक्त मला नुकसानी मोबदला म्हणून रूपये 4,00,000/- आरटीजीएस च्या माध्यमातुन दिले ही गोष्ट बालकृष्ण आचार्य याला पूर्णपणे माहीत होती म्हणून माझ्या खात्यात वरील रक्कम आल्यानंतर त्याने मला प्लाॅट गहाण सोडविण्याकरीता अडीच लाखाची अत्यंत गरज आहे असे दर्शवून माझ्याकडून माझी भाची रंजना तिच्या खात्यात त्याच दिवशी रूपये 2,50,000/- आरटीजीएसने ट्रान्सफर करून घेतले व आता जेव्हा मी उसने दिलेले पैसे परत मागीतले तेव्हा सुरूवातीला मला टाळाटुळ केली व नंतर खोटी बनावटी कहानी तयार केली.
मी फ्रॅकल्र्टी ट्रेनर म्हणून वेगवेगळया संस्थामधे महाराष्ट्रात उद्योग व्यवसाय व व्यक्तीमत्व विकास आणी उद्योग चे प्रशिक्षण देतो. माझे स्वतःचे किंवा कुटुंबाचे ईतर व्यक्तीचे कुठेही संगणक संस्था नाही परंतु संगणक संस्थांनी किंवा ईतर शैक्षणिक संस्थांनी आणि जी.जी.ओ. यांनी मला बोलाविल्यास मी लेक्चर देण्यास जातो व मानदान घेवून जातो. माझे सर्टीफिकेट बनूवन देणे किंवा नौकरी लावून देणे अथवा रोजगार उपलब्ध करून देणे असे कामे नाहीत व मी करत नाही.
माझ्याविरूद्ध केलेल्या तक्रारीत पोलीसास असे सांगण्यात आले की ईतर आरोपीशी संगणमत करून रंजनाला नौकरी लावून देतो व बालकृष्ण आचार्याला बारावी पास झाल्यावर प्रमाणपत्र सर्टीफिकेट बनवून देतो हे बिनबुडाचे खोटे व बनावटी आरोप लावण्यात आले. आपण कल्पना करू शकता ज्या व्यक्तीच्या खात्यात आज पावेतो पाच लाखाची एकमुस्त रक्कम जमा नाही ज्याच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे प्लाॅट गहाण आहे व कोणतीही पदवी किंवा वैद्यकीय प्रमाणपत्र नसतांना उत्पन्न्ााचे साधन नाही व ज्याची पत्नी एम.ए. पर्यंत शिक्षित असतांनासुध्दा नौकरीसाठी आजपावेतो 35-36 वर्षाचे वय झाल्यानंतर या वयात सरकारी नौकरी भेटत नाही याची कल्पना असल्यामुळे कशी काय नौकरीसाठी आणी कुठुन पैसा देवू शकतो. याशिवाय ती एम.ए. पर्यत शिक्षित झाल्यानंतर तिला सहज कल्पना असेल ती परीक्षेत बसल्याशिवाय कुठलीही संस्था बारावी बोर्डची परीक्षा पास झाल्याचे सर्टीफिकेट देवू शकत नाही तेव्हा जगात एकही मुर्ख सापडणार नाही जो न होणा-या कामासाठी पैसे खर्च करेल यावरून आपणास कल्पना येईल की, ती माझे जवळून घेतलेले पैसे परत न करण्याच्या उद्देशाने व मला खोटया प्रकरणात गुंतवून माझ्याकडून मला ब्लॅकमेल करून अजुन तीन लाख रूपयाची खंडणी घेण्यासाठी खोटी तक्रार करण्यात आली म्हणून मला न्यायालयाने दिनांक 7/9/2020 रोजी अग्रीम जमानत अर्ज मंजुर करून अग्रीम जमानत दिलेली आहे पण पोलीसांच्या चैकशीत मी नंदनवन पो.स्टे. गुन्हे शाखा यामधे जेव्हा बोलविण्यात आले तेव्हा त्यावेळस हजेरी लावली आहे व माझे बयान नोंदविण्यात आले आहे. तरीपण माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने खोटी माहीतीच्या आधारे जे वृत्त वृत्तपत्रात सत्याचे सहानिशा न करता प्रकाशित करण्यात आले आहे त्यांचे खंडन करण्याकरीता ही पत्रपरिषद बोलाविली आहे. आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की, माझे सविस्तर खंडण प्रकाशित करून मला न्यायदान मिळण्यास सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.