Home Breaking News महाराष्ट्र सरकारची लग्न सोहळा कार्यालयास परवानगी….

महाराष्ट्र सरकारची लग्न सोहळा कार्यालयास परवानगी….

139 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर
लग्न समारंभ सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता बंदिस्त सभागृहाच्या 50 टक्के क्षमते इतक्या मर्यादित महाराष्ट्र शासन अंतर्गत दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी, लग्न सोहळयास व सांस्कृतिक कार्यक्रमात परवानगी दिली असून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांचे आभार व्यक्त केले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रसह, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयचया अनुषंगाने शुभमंगल कर्यायेप्रसंगी येणा-या सांस्कृतिक लग्न व लग्न सोहळा, सभागृह व जागेच्या क्षमतेनुसार 50% कार्यक्रम सुरू झालेले आहे. याकरिता कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून देशातील अनलाॅक मध्ये नागपूरचे आदणीय नेते, खासदार, मा. आमदार महाराष्ट्र राज्य, मुंबईचे विरोधी पक्षनेते यांनी राज्यसभेत परवानगी मिळविण्याकरिता सतत परिश्रम घेतले. तसेच यासर्वांनी राज्यसभेत परमिशन करिता बाजू मांडल्यामुळे परमिशन मिळाली. आॅल महाराष्ट्र व नागपूर टेंट हाऊस असोसिएशन व विश्वस्त कार्यकारिणी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांचे आभार मानले. शुभमंगल प्रसंगी येणा-या मंडप डेकोरेशन, केटरिंग, डिस्प्ले, बॅड पार्टी, घोडाबग्गीवाले, फोटोग्राफर, साऊंड सिस्टम, लाइटिंग, फेटेवाले व इतर असोसिएशन सहभागी होऊन कोवीड-19 कोरोनाच्या महामारीचा पादुर्भावामुळे आॅल महाराष्ट्र टेंट असोसिएशन वर उपासमारीची वेळ आली म्हणून महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आणि नागपूर मध्ये हडताल व आंदोलनाचा इशारा दिल्या मुळे महाराष्ट्र राज्य सरकारने लग्नकार्यास परमिशन दिल्या मुळे सगळे बेरोजगारांना कामाची दिशा मिळाली. त्यामुळे सरकारचे आभार मानले आॅल महाराष्ट्र टेंट डीलर्स आॅर्गनयझेशन वेलफेअर चे विश्वस्त कार्यकारी मंडळाचे सतत मार्गदर्शन मिळाले. नागपूर टेन्ट हाऊस असोसिएशनला काम करण्यास मदत मिळाली. नागपूर टेंट हाऊस असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष मा. सुनील राऊत व विश्वस्त कार्यकारणी मंडळ व सगळेच असोसिएशनच्या वतीने पोलीस कर्मचारी, डाॅक्टर्स व प्रशासकीय कार्यालयाचे आभार व्यक्त केले आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकात सचिन इनकाने यांनी कळविले आहे.