Home Breaking News चोला मंडलम फायनान्स ला मनसे वाहतूक सेनेचा दणका

चोला मंडलम फायनान्स ला मनसे वाहतूक सेनेचा दणका

74 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, चोला मंडलम् फायनान्सला महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा दणका एकीकडे कोरोनामुळे सर्व सामन्य लोकांचे जीवन विस्कळीत झाले असून कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्यामुळे लोकांवर उपासमारीचे वेळ आली आहे. त्यामध्ये सर्वसामान्य वाहनधारक सुद्धा समाविष्ट आले. आता कुठे तरी सर्व सामान्य वाहन धारकांना हाताला व्यवसाय मिळत आहे. पण तो व्यवसाय पुरेसा नसल्यामुळे सर्व सामन्य वाहन धारकांना आपल्या वाहनाचे हफ्ते (किस्त) भरण्याला शक्य होत नाही आहे. तरी या विषयांचे प्रायव्हेट फायनान्स कंपन्या काहीच घेणेदेणे नाही. यामध्ये चोलामंडलम फायनान्स सुद्धा मोडीत आहे. चोलामंडलम फायनान्स चे वसुली अधिकारी सर्व सामान्य लोकांना धमकावून, वेळ पडल्यास गुंडाचा मदतीने मारहाण करून सर्व सामान्य लोकांचे वाहन बेकायदेशीर रित्या उचलून नेत आहे. जे की पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वाहन उचलून (जप्त) केल्यामुळे वाहन धारकांना व्यवसाय करण्यास खुपच त्रास घेत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यामुळे मानसिक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना नागपूर तर्फे प्रदेश सरचिटणीस मा हेमंत गडकरी यांच्या मार्गदशनाखाली जिल्हा संघटक सचीन धोटे व शहर संघटक मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वात चोलामंडलम फायनान्सचे व्यवस्थापक पंकज ढगे यांना घेराव घालण्यात आला.

यावेळी त्यांना या विषयांचे गांभीर्य लक्षात आणून देत. त्यांचे अधिकारी कसे सर्वसामान्य लाकांचे वाहन बेकायदेशीर पणे उचलून नेतात. उद्धट बोलतात, धमकवितात, वेळ पडल्यास मारहाण करतात हे लक्षात आणून दिले. त्याचबरोबर हा उर्भटपणा यानंतर मनसे खपवून घेणार नाही, त्याच प्रमाणे सर्व सामान्य वाहनधारकांसोबत कोणीच नाही असे समजू नका, जर आम्ही डोक्यात घेतले तर तुम्हाला आमची स्टाईल आवडणार नाही. यामुळे कायदयाच्या बाहेर जावून यानंतर आपल्या कंपनी तर्फे सर्वसामान्य वाहनधारकावर कारवाई केल्यास यानंतर मनसे शी गाठ असेल. असा गंभीर इशारा यावेळी मनवासे शिष्टमंडळा तर्फे देण्यात आला.
यावेळी सचीन धोटे, मंगेश शिंदे यांचा सह गजानन टिपले, प्रवीण गायकवाड, प्रभूदास डोंगरे, देवेंद्र जैन, हरीओम काटनकर, चंद्रशेखर बागडे, अभर भारद्वाज योगेश चैरसीया इत्यादी उपस्थित होते.