हर्ष सोबत घेवुनी आली दिवाळी
तम निराशा भेदुनी आली दिवाळी
चैकटीवर रंग हसला तोरणांचा
रोषणाई माळुनी आली दिवाळी
डोलतो आकाश कंदिल सांजवेळी
तरकांना स्पर्शुनी आली दिवाळी
स्नान होता रोज येतो गंध भुवरी
ब्ंाधने जोपासुनी आली दिवाळी
वैभवी समृध्द लक्ष्मी जागली
ज्योत पहिली होवुनी आली दिवाळी
राजवंशी दिप पणती शोभती
तेज घन ओवाळुनी आली दिवाळी

