अवैध दारू, जुगार, मटका, वाळू उपसा ताबडतोब बंद करावा अन्यथा आंदोलानाचा इशारा : रिपाई

595

विदर्भ वतन न्युज पोर्टल,  प्रतिनिधी : 

खटाव तालुक्यामध्ये खूप ठिकाणी अवैध बेकायदेशीर धाब्यावर्ती व लपून घरामध्ये दारू विक्री चालू आहे. त्यामुळे लोकामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनाधिता वाढत आहे व जुगार, मटका, वाळू उपसा सातत्याने चालू आहे. तालुक्यातील नद्या व ओढ्याच्या पात्रामधून बेकायदेशीर वाळू उपसा सातत्याने चालू आहे. त्यामुळे नदी व ओढ्याच्या आजूबाजूला परिसरामध्ये धोका निर्माण होऊ शकतो तसेच जुगार, मटका हि मोठ्या प्रमाणत चालू आहे या सर्व अवैध व्यवसाय मुळे सामाजिक जनजीवन प्रभावित होऊन तरूण पीढीवर दुषपरिणाम होत आहे नैसर्गीक संतुलन रेतीचा अवैध उपसामुळे बिघड़त आहे तरी कारवाई करावी अन्यथा रिपाई स्टोईलने आंदोलन करण्यात येईल.