Home Breaking News डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवस ऊर्जादायी दिवस !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी दिवस ऊर्जादायी दिवस !

721 views
0


विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल सातारा जिल्हा प्रतिनिधी :

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची बालपण साताऱ्यात गेले. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा प्रारंभ झाला. 7 नोव्हेंबर 1900 रोजी त्यांनी प्रतापसिंह हायस्कूल येथे इयत्ता पहिली मध्ये इंग्रजी वर्गात प्रवेश घेतला. हा शाळा प्रवेश दिन ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून महाराष्ट्रातील सर्व शाळा-महाविद्यालयात शासन स्‍तरावर साजरा व्हावा यासाठी विद्यार्थी दिवसाचे प्रवर्तक साहित्यिक अरुण जावळे यांनी मागील सोळा वर्षापासून महाराष्ट्र सरकारकडे आग्रह धरला. या आग्रहाला दाद देत सरकारने तीन वर्षापूर्वी विद्यार्थी दिवस घोषित केला. आता हा विद्यार्थी दिवस भारतभर साजरा होणे महत्वाचे दिल्ली दरबारी शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी अधिकृत घोषणा करणे गरजेचे आहे. डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन व डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या नावाने वाचक दिन देशभर साजरा केला जातो, तसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यार्थी दिवस म्हणून भारतभर साजरा व्हायला हवा, यासाठी राज्य आणि राज्याबाहेरून 1 लाख 25 हजार पत्रे दिल्लीला पाठवण्याची मोहीम राबवतोय. काही पत्रे रक्ताने लिहितोय. खरतर, सातारचे हे छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेशाने कमालीचे चर्चेत आले आहे. ही शाळा पाहावयास देशा-विदेशात कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात यावा यासाठी आग्रही धरला आहे. जुलै 2018 मध्ये मुंबई आणि नागपूर मध्ये काही मंत्र्यांशी याबाबत चर्चाही झाली. त्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय शिक्षण समिती गठीत केली गेली, मात्र या समितीने ही आवश्यक पावले उचललेली नाहीत. वास्तविक, छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल हा ऐतिहासिक ठेवा असल्याने तो जतन करणे आवश्यक आहे. जगात सर्वात हुशार विद्यार्थी कोण होऊन गेला यासंबंधी संशोधन मध्यंतरी झाले. इंग्लंड अमेरिका येथील कोलंबिया ऑक्सफर्ड अशा नामवंत विद्यापीठ यांनी यासाठी पुढाकार घेतला. हे संशोधन बरेच महिने सुरू राहिले. नामवंत विद्यापीठांमधील तज्ञ यामध्ये सक्रियपणे राबत होते या संशोधनातून एक नंबर साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव पुढे आले. जगभर अनेक महापुरुषांचे असंख्य पुतळे आहेत. परंतु जगातील इतर कोणत्या महापुरुषाच्या पुतळ्याखाली नॉलेज ऑफ सिम्बॉल असे कोट करण्यात आले नाही. कोलंबिया विद्यापीठात मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे त्यावर नॉलेज ऑफ सिम्बॉल असे करण्यात आले आहे. या सर्व संबंधाने या हायस्कूल ला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याबरोबर भारतातील शैक्षणिक आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून याची घोषणा करणं, मला महत्त्वाची वाटते. हे सर्व गौरवपूर्ण दाखले देण्याचे तात्पर्य असे, अफाट आणि अचाट बुद्धिमत्ता लाभलेले आभाळ उंचीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सातारच्या छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल चे विद्यार्थी होते. शाळेच्या रजिस्टरला आजही त्यांचे नाव बिहार रामजी आंबेडकर असे असून 1914 क्रमांक आला तशी नोंद आहे. प्रवेश घेताना या शाळेच्या मनाला आणि तेथील मातीच्या कणाला पुसटशी कल्पनाही नसेल की हा बाल भिवा भविष्यात जगातील आदर्श विद्यार्थी ठरेल परंतु हे सार दिवाने आपल्या विलक्षण प्रतिभेच्या जोरावर खरं ठरवले मी तर असे म्हणेन या शाळेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा प्रज्ञासूर्य जगाला मिळाला. या शाळेत त्याचे पाऊल पडले आणि याच मातीतून प्रज्ञेच्या, विद्वत्तेच्या तिच्या अवकाशात उंच भरारी घेण्याचे बळ सुद्धा त्यांना प्राप्त झाले. त्यामुळे छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल हे केवळ सातारकरांचे नाही तर या जगाचे पेरणास्थान ठरलेलं असून त्यांचा शाळा प्रवेश भारताच्या दृष्टीने अत्यंत प्रेरणादायी ठरलेला आहे खरंतर नवा, समृद्ध,शक्तीशाली भारत उभा करायचा असेल, तमाम गोरगरिबांच्या, दलित वंचितांच्या आणि एकूणच समाजाच्या नव्या पिढीला शिक्षणाचे मुख्य धारेत आणायचं असेल तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हे पाहण्याची आवश्यकता आहे. यातूनच समाजाला शिक्षणाची जबरदस्त प्रेरणा आणि चालना मिळेल तसेच शालेय शिक्षण चळवळ अधिक गतिमान होईल कारण भारताच्या शैक्षणिक इतिहासातील सात नोव्हेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन म्हणजेच ‘विद्यार्थी दिवस’ हा ऊर्जादायी दिवस आहे.