कोरियन युद्ध आणि चीनी विस्तारवाद

252

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल,  :                                                                         लेखक

 कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)

ऑक्टोबर,२०२० मधे चीन सरकारनी कोरियन युद्धातील विजयाचा सत्तरावा  विजय दिन साजरा केला. अमेरिकन सैन्यावरील विजयात पीपल्स लिबरेशन आर्मीचा (पीएलए) केवढा मोठा वाटा/हात होता याच, चीनी मुखपत्र ग्लोबल टाईम्सनी त्याच्या संपादकीयात रसभरीत वर्णन केल आहे. विजयामधे प्रत्त्ययाला आलेली; दांडगी इच्छाशक्ती, सामरिक कर्तृत्व, सैनिकांवरील चीनी संस्कार,खंबीर राजकीय/लष्करी नेतृत्त्व, चीन सरकारचा निपक्षपातीपणा आणि उजागर झालेल साम्यवादाच वर्चस्व; या बद्दल पीएलएची पाठ थोपटतांना ग्लोबल टाईम्सनी सामरिक सत्याचा विपर्यास केला, तोडमरोड केली अस म्हटल्यास ते वावग होणार नाही. ग्लोबल टाईम्सच्या या  मिमांसेची अखेर; ”टुडे, दीज व्हेरी फॅक्टर्स पोर्टेण्ड अनादर रिसाऊंडिंग व्हिक्टरी फॉर चायना इन एनी कॉन्फ्लिक्ट दॅट मे ब्रेक आऊट इन साऊथ चायना सी ऑर इन नेबरिंग हिंदरलँड” या वाक्यानी झाल्यामुळे सांप्रत दृष्टिपथातअसलेल्या चीनी विस्तारवादाचा आरंभ/ओनामा कोरियन युद्धापासूनच झाला असा निष्कर्ष काढता येतो.

कोरियन युद्धानंतरच्या जगातील सामरिक समीकरणात लक्षणीय बदल झाला आहे.चीनी विस्तारवादी संबंधी माओची कडवी विचारधारा आणि कट्टर साम्यवादी मूलतत्वांच्या पालनामुळे, चीनची आर्थिक भरभराट झाली आणि जागतिक महाशक्ती बनण्याच्या त्याच्या महत्वाकांक्षेला खतपाणी मिळाल, दुर्दैवानी त्याच  गतीमान प्रेरक शक्तींमुळे आज चीनच्या राजकीय/आर्थिक/लष्करी सुरक्षेला धोका निर्माण झालेला दिसून पडतो.आजमितीला चीन; कोणतेही अंतर्गत कोणताही बदल न करता, शाश्वत सत्याकडे दुर्लक्ष करून; बहुतांश जागतिक संस्था, संसाधन, दळणवळणाचे मार्ग आणि लक्ष्य राष्ट्रांच्या (टार्गेट नेशन्स) सीमा/भूभागांना आपल्या अधिपत्याखाली आणू इच्छितो/पाहतो. सांप्रत चीननी, दक्षिण चीन समुद्र आणि लडाखमधे सामरिक वर्चस्व मिळवण्यासाठी लष्करी पाऊल उचलली आहेत. या/अशा सामरिक कारवाया करत असतांना, कोरियातील विजया साठी घेण्यात आलेल्या सामरिक/राजकीय निर्णयांना पुनर्जीवीत करण्या मागचे चीनी हेतू अस्पष्ट आहेत. म्हणूनच; दक्षिण चीन समुद्र आणि लडाखमधे आज होत असलेल्या चीनी कारवायां मागील धोरणांना, १९५०-५३मधल्या कोरियन युद्धातील विजयाची गुणक (फॅक्टर्स) लागू पडतील का हा प्रश्न उभा ठाकतो/समोर येतो.

दुसऱ्या महायुद्धात चीन मित्रराष्ट्रांच्या खेम्यात (अलाईड कँम्प) होता.जपानच्या दारुण पराभवानंतर सुद्धा चीनमधे शांती येऊ शकली/आली नाही. १९३७-४५ दरम्यान मित्र राष्ट्रांकडून लढणाऱ्या माओत्से तुंगनी १९४५ नंतर चीनमधे कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली. माओ आणि पार्टीने, १९४८ मधे कात टाकली. चाँग काई शेकच्या तथाकथित जुलमी  राजवटीच्या जोखडातून चीनला मुक्त करण्यासाठी प्रसिद्ध “लॉन्ग मार्च” सुरू होऊन, १९४९ मधे संपूर्ण चीनवर कम्युनिस्टांचा कबजा झाला.चाँगशी एकनिष्ठ असलेल्या राष्ट्रवाद्यांनी (नॅशनॅलिस्ट फोर्सेस) फार्मोसात माघार घेतली. या संपूर्ण कालखंडात, माओ आणि कम्युनिस्टांच्या अन्वनित अत्याचारांनी  क्रौऱ्याची परिसीमा गाठली. फार्मोसातून येणाऱ्या बातम्यांमधून जगाला नव्या कम्युनिस्ट संकल्पनेची चुणूक दिसू लागली.

प्राचीन काळापासून एकसंध कोरियन द्वीपकल्पावर गोगुरयो, पैकचे, सिल्ला, पऱ्हे, गोरेयो आणि शेवटच्या जोसन राजवंशांची सत्ता होती. १९१० मधे जपाननी कोरियावर खुल, हिंसक आक्रमण करून सत्ता काबीज केली. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस १९४५ मधे जपाननी अमेरिकेच्या जनरल डग्लस मॅकॉर्थर समोर शरणागती पत्करली. दुसर महायुद्ध संपताच, अमेरिका व सोव्हिएट युनियनमधे (सांप्रत रशिया), जगावर कोण राज्य करणार, खरी महासत्ता कोण याच्या निकालासाठी, शीतयुद्ध सुरू झाल. १९४९ मधे रशियानी, कोरियातून जाणाऱ्या ३८व्या अक्षांशाच्या (थर्टीएड्थ पॅरॅलल) उत्तरेला, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाला  (डीपीआरके) मूर्त स्वरूपात आणून, कम्युनिस्ट राजवट स्थापन केली. उत्तरार्थ  अमेरिकेनी अक्षांशाच्या दक्षिणेला स्थापन झालेल्या सैनिकी प्रशासनाच्या रिपब्लिक ऑफ कोरियाला  मान्यता देऊन,उत्तरेकडील कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात त्याला सर्वकष मदत करण/देण सुरू केल.माओत्से तुंग दूरदृष्टीचा नेता असल्यामुळे,चीनचा शेजारी असणाऱ्या कोरियात काय चालू आहे या कडे त्याच बारीक लक्ष होत. “चायनीज टीथ विल बी सिव्हीयरली  अफेक्टेड विदाउट प्रोटेक्शन ऑफ कोरियन लिप्स” या उक्तीनुसार, कोरियात भांडवलशाहीचा पुरस्कर्ता अमेरिका येऊन बसल्यास, पूर्व आशियाला कम्युनिस्ट राजवटीखाली आणण्याच (कम्युनिस्ट डॉमिनन्स) स्टालिन आणि माओच स्वप्न कधीच साकार होऊ शकणार नाही याची चीन आणि माओला पूर्ण कल्पना होती.

म्हणूनच माओनी १९५०च्या सुरवातीला, परकीय आक्रमणापासून बचावासाठी होणाऱ्या युद्ध/ चकमकींमधे एकमेकांना सर्वंकष मदत करण्याच्या ”सायनो सोव्हिएट डिफेन्स ट्रीटी”वर हस्ताक्षर केलेत. १९५० च्या मध्यात, कम्युनिस्ट राजवटीखालील डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियानी अमेरिका समर्थित रिपब्लिक ऑफ कोरियावर आक्रमण केल्यामुळे कोरियन युद्धाला सुरवात झाली. डग्लस मॅकार्थरच्या नेतृत्वात अमेरिकन व दक्षिण कोरियाच्या सेनांनी, रशिया समर्थित उत्तर कोरियन फौजेला पार चीनच्या सीमांपर्यंत मागे रेटल आणि कम्युनिस्ट पीछेहाटीमुळे चवताळलेल्या चीननी, १९५०च्या शेवटी कोरियन युद्धात उडी घेतली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिपत्याखाली तेथे तैनात झालेल्या भारतीय सेनेनी १९५३ मधे कोरियात युद्धबंदी लागू केली. ३८व्या अक्षांशावर दोन्ही देशांची सीमा निश्चित करण्यात/ आखण्यात आली. त्यावेळी मारल्या गेलेल्या वीस लाख सैनिकांसमेत आजतायगत पन्नास लाख नागरिक/ सैनिकांची आहुती दिलेल्या कोरियन द्वीपकल्पात अजूनही शांतता नाही.दक्षिण/उत्तर कोरियात केंव्हाही युद्ध होऊ शकत एवढच नाही तर अमेरीका दक्षिण आणि चीन व रशिया उत्तर कोरिया मागे उभे असल्यामुळे,तेथेच तीसर महायुद्धही होऊ शकत. ”लँड ऑफ मॉर्निग काम” म्हणून प्रसिध्द असलेल्या कोरियन द्वीपकल्पातील भूमीवर सुरू झालेल्या महाभयंकर युद्धाला, लष्करी आयामा बरोबरच वॆचारिक (आयडियॉलॉजिकल) आणि सामाजिक (सोशल) आयामही होता याची कल्पना जगाला त्यावेळी आली नाही/नव्हती.

वर्तमानात, “चायना विल नेव्हर सीक हेगेमोनी (राजकीय वर्चस्व/धुरीणत्व), एक्सपान्शन (विस्तारवाद) ऑर स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स (दबावी परीघ)” अशी ग्वाही, राष्ट्रपती शी जिन पिंगनी, सप्टेंबर, २०२०मधे संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत भाषण करतांना दिली.वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.चीनी कम्युनिस्ट पार्टीच्या १९व्या सेंट्रल कमिटीच पाचव प्लेनरी सेशन बेजिंगमधे २६-२९ ऑक्टोबर, २०२० दरम्यान, १९८ स्थायी सदस्य, १६६ अस्थायी सदस्य, स्टँडिंग कमिटी सदस्य, पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि देशभरातील ८०० विचारवंत/बुद्धीवादी/ प्रसिद्ध नागरिक/प्रतिनिधींच्या उपस्थिती व  सहभागानी संपन्न झाल. पार्टीमधल्या अंतर्गत राजकीय/वैचारिक विरोधाला बाजूला सारून, राष्ट्रपती शी जिन पिंगनी प्लेनरी सेशनमधे;आक्रमक चीनी परराष्ट्र धोरण,भारत विरोधी लष्करी कारवाई व दक्षिण चीन समुद्रातील सागरी कारवाया या मुद्द्यांवर आणि प्रचलित साम्यवादाच आधुनिकीकरण २०३५ पर्यंत पूर्ण करणे, सामरिकदृष्ट्या अती सबळ/सशक्त राष्ट्राची उभारणी,नव्या धर्तीचा विकास, नवीन उपक्रमांचा ओनामा, ग्रामीण चीनचा विकास, खुल्या व्यापारी क्षेत्राची पायाभरणी या संबंधातील १४व्या पंच वार्षिक योजनेवर;सर्व उपस्थितांची सहमती/मान्यता मिळवली.सेंट्रल  कमिटीनी दिलेल्या या मान्यतेमुळे शी जिन पिंगना ”स्ट्राईक ऍडव्हर्सरी व्हेन ही इज वीक  अँड प्रिझर्व्ह युवरसेल्फ व्हेन ही इज स्ट्रॉंग”  या सन त्झू  या चीनी तज्ञाच्या उक्तीनुसार; भारत चीन सीमेवर घूसखोरी करून भूभाग हडप करणे; पूर्व चीन समुद्र व दक्षिण चीन समुद्रात व्हिएटनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सवर दबका मारणे आणि कोविद कोरोना विषाणू प्रसाराचा फायदा घेऊन जगभर दादागिरी करणे अशा  विवक्षित कार्यक्षेत्रांमधे त्यांच्या मन मर्जीनुसार; निर्णायक आघाडी घेण्याची मुभा  मिळाली आहे. मात्र, अमेरिकेत  चीन समर्थक जो बायडेन सत्तेत आल्यानंतरच, शी जिन पिंग कुठलीही सामरिक कारवाईत हात घालतील. या पार्श्वभूमीवर, वरील मुभेंतर्गत, शी जिन पिंग, आगामी हिवाळ्यात भारताविरुद्ध लष्करी कारवाई सुरू करू शकतात/करतील, असा कयास केल्यास तो चूक नसेल.

चीनकडे अत्याधुनिक हत्यार, संसाधन, विमान, जहाज व क्षेपणास्त्र असल्यामुळे “चायनीज ड्रीम ऑफ रिज्युनेव्हेशन अँड एम ऑफ प्रॉस्परस, डेव्हलप्ड सोसायटी विथ वॉर विनिंग मॉडर्न पीएलए बाय २०५०” सहज शक्य होईल असा विश्वास शी जिन पिंगना वाटतो अस म्हटल्यास ते वावग होणार नाही. २०१६च्या अमेरिकन निवडणुकीच्या वेळी आणि नंतर चीननी दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट उभारून त्यावर लष्करी तैनाती सुरू केली होती. पण अमेरिकेनी त्याला प्रबळ विरोध न केल्यामुळे सोकावलेल्या चीननी,विषाणू प्रसाराच्या आडून या निवडणुकीच्या आधीच भारताच्या लडाखमधे घूसखोरी करून आपली ध्येय निश्चिती केली. त्यानंतर  त्यानी जगाविरुद्ध; आर्थिक, संगणकीय, माहितीज्ञान व जैविक युद्धाच रणशिंग फुंकल.

चीनी वर्चस्वाला आव्हान देणाऱ्या देशांना चीन, पाशवी सामरिक शक्ती आणि/किंवा जुलूम/ जबरदस्तीनी वठणीवर आणतो हे ऐतिहासिक सत्य आहे. पण आजही त्याची ही नीती, लडाख किंवा/आणि दक्षिण चीन समुद्रात सफल होईल याची सामरिक खात्री,इतर कोणी तर सोडाच पण खुद्द चीनही देऊ शकत नाही. आजची पीपल्स लिबरेशन आर्मी, माओ काळातील सेने प्रमाणे/सारखी काटक, चिवट आणि युद्ध पारंगत नाही हे, व्हिएटनाममधील १९७८च्या चीनी हस्तक्षेपाच्या वेळी प्रत्ययाला येऊन; पाण्याखालील ७५० दगडाळ बेटुक्यांच्या स्पार्टली बेट समुहाकरता चीनच्या; व्हिएटनाम, ब्रुनेई, तायवान, फिलिपिन्स आणि मलेशियाशी झालेल्या खंडाजंगीच्या वेळी त्यावर शिक्का मोर्तब झाल होत.

सगळ्यात महत्वाच म्हणजे दक्षिण चीन समुद्र आणि लडाखमधे सुरू असलेल्या संघर्षाचा आयाम, माओकालीन संघर्षीय आयामा पेक्षा खूप वेगळा आहे. शिवाय, आजच चीनी नेतृत्व माओकालीन नेतृत्वासारख बेरकी आणि प्रेरणादायकही नाही. युद्ध कशा प्रकारे करायच/लढायच, शस्त्रास्त्र तंत्रज्ञानातील वर्चस्व, व देशातील आर्थिक/सामाजिक/ सामरिक परिस्थिती आणि काळवेळ/भूगोल व हवामान/शत्रूसारख्या सतत बदलत्या गोष्टींमुळे; संघर्षाचे आयामही बदलून जातात हे सध्याच्या चीनी नेतृत्वाच्या पचनी पडलेल नाही. म्हणूनच सुरवातीला अवैध घुसखोरीच्या आश्चर्याचा धक्का बसलेल्या भारतानी लडाखमधील शिखरांवर पहिले कबजा करून, चीनवर सामरिक कुरघोडी केली. त्याच प्रमाणे, तायवान  व जपानविरुद्ध कारवाई करण्याची धमकी देताच, दक्षिण चीन समुद्रात आपले सागरी बेडे आणून (इंडक्शन ऑफ फायटिग फ्लोटिलाज), अमेरिकेनी चीनी सागरी आगळिकीच्या मुसक्या आवळलेल्या/बांधल्या.

या सर्व रामरगाड्यात चीननी आपल्या कारवाईला वैध ठरवत, तेथील जनतेला आणि उर्वरित जगाला, बेमालूम भ्रमात ठेवल/ टाकल आहे. त्या करता चीन, ज्या प्रमाणे तायवान, तिबेट, भारतात केल त्या प्रमाणे, जागतिक संगणकीय जाळ्याला छिन्नविछिन्न (सायबर डिसरप्शन ऑफ ग्लोबल नेटवर्क) करतो, अपप्रचाराची राळ उठवतो (डिसइन्फर्मेशन कॅम्पेन), स्थानिकांना हाती धरून लक्ष्य देशात सशस्त्र गनिमी युद्ध छेडतो (स्टेट स्पॉंन्सर्ड टेरोरिझम)  आणि/किंवा त्यांच्याशी मर्यादित चकमकी (लिमिटेड आर्म्ड कॉन्फ्लिक्ट) देखील करतो. या प्रणालींतर्गत पीएलए, आजमितीला लडाखमधे घूसखोरी करून तेथील भूभागाचे लचके तोडण्यात गुंतली आहे. चीन; १९६२पासून लागू असलेल्या लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलमधे  (एलएसी) बदल करून, अक्साई चीन हायवेच्या अवैध  बांधकामाला हानी पोचू नये (प्रोव्हाइड डेप्थ) या दृष्टीनी, लडाखमधे धक्का प्रतिबंधक भूभाग (बफर एरिया) निर्माण करू इच्छितो  आहे. हा हमरस्ता, चीननी जबरदस्ती कबजा केलेल्या  अक्साई चीनमधून जात,तिबेट व झिंगजियांग प्रांतांना जोडतो. प्रत्यक्ष युद्धाऐवजी भूभागाचे लचके तोडण्याची चीनी प्रणाली, या कारवाई मधून उजागर होते. तायवान व जपानवर आपली लढाऊ विमान पाठवून चीन, त्या क्षेत्रात भीतीची वातावरण  निर्मिती करतो आहे. या सर्व कारवायांच्या धूम्रपटलाच्या आडून (बिहाइंड धिस स्मोक स्क्रीन) चीन, त्याची प्राथमिकता असलेल्या (सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी) “इंडो पॅसिफिक रीजनला लक्ष्य करतो आहे.

आपली गमावलेली इभ्रत परत (रिक्लेम लॉस्ट ग्लोरी) आणण्यासाठी चीन आपल्या राजकीय/लष्करी बळाच पुनर्जीवन (पोलिटिकल/मिलिटरी रिज्युव्हेनेशन), राजकीय व लष्करी पुनर्बांधणीच्या (पोलिटिकल/मिलिटरी रिव्हिजन) माध्यमातून त्याची जागतिक वर्चस्वाची (वर्ल्ड डॉमिनेशन) संकल्पना जगावर  लादू इच्छितो/लादू पहातो आहे. ज्या राष्ट्रांवर चीन ही संकल्पना जबरदस्ती लादू पाहतो ते, या जबरी दमनाच्या संकल्पनेला काट शह देतांना, पहिले चीन विरोधात सावध/जागरूक, सामरिक/ राजकीय/आर्थिक पवित्रा घेतात आणि नंतर या तीनही स्तरांवर त्याच्याशी सलोखा प्रस्थापन करण्याचे प्रयत्न करतात/सलोखा स्थापन करतात. आपल्या राजकीय/लष्करी/आर्थिक दादागिरीमुळे सोकावलेला चीन, आपल्या लक्ष्याच्या या  विवश अंकितीकरणाला वरील संकल्पनेचा विजय मानतो आणि आपल्या कारवाईचे काय परिणाम होतील याचा पूर्व आढावा न घेता पुढील लक्ष्याशी त्याच उद्दंडतेनी व्यवहार करतो. शी जिन पिंगच्या भव्य स्वप्नांना, संकल्पनांना मूर्तस्वरूप येण्या/देण्याचा (सेल्फ फुलफिलिंग प्रॉफेसी) हाच एकमेव मार्ग आहे असा त्याचा ठाम विश्वास आहे.

शी जिन पिंगच्या या आक्रमक विस्तारवादी धोरणाला भारतानी  उत्तम प्रतिसाद दिला आहे. जरी शी जिन पिंग यावेळी सेंट्रल कमिटीच्या कचाट्यातून निसटले असले तरी; अमेरिकेद्वारा समुद्री कोंडी/कुंठा आणि भारताची सामरिक कुरघोडी  यामुळे त्याच्या वरच अंतर्गत आणि बाह्य दडपण सतत वृद्धिंगत होत आहे. चीन बरोबर एलएसीचा सीमा विवाद शमवण्यासाठी ही वेळ योग्य आहे. भारताशी युद्ध करण्यापेक्षा सीमावाद संपवण हे चीनच्या सामरिक हितासाठी जास्त उपयुक्त आहे याची चीनला जाणीव आहे. सैन्य माघारीच्या जवांजाळात न अडकता, “सीमा आखणीला मान्यता देऊन कारवाई पूर्ण करेस्तोवर लडाखमधील सामरिक कुंठा (स्ट्रॅटेजिक मिलिटरी स्टॅन्ड ऑफ) अशीच राहील” हा पवित्रा भारतानी अंगिकारला पाहिजे. इट इज हाय टाईम, इंडिया शुड नॉट ब्लिंक ऍट द बॉर्डर.