विद्यार्थी आणि शिक्षक गायन स्पर्धेचा  निकाल जाहीर…….

288
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संचालित श्रीमती दादीबाई  देशमुख हिंदू मुलींची शाळा महाल, नागपूर आणि स्वरवेध नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने कै.दि.वा. फडणवीस जन्मशताब्दी वर्षा निमित्य आयोजित भव्य एकल गीत गायन स्पर्धा नुकतीच online संपन्न झाली. ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. पहिला गट विद्यार्थी वर्गासाठी होता. यात “देशभक्ती” गीत गायन हा विषय होता. दुसरा गट शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या साठी “भजन” गायन हा विषय होता. दोन्ही गटात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थी संख्या जास्त असल्याने प्राथमिक आणि माध्यमिक गट करून त्यांना रोख पारितोषिक घोषित करण्यातआले.
प्राथमिक गट :-
प्रथम-युवराज लोया -वणी -1000/-रोख.
द्वितीय-ऋषिकेश कोडापे -नागपूर- 700/
तृतीय-अमेय गावंडे -हिंगणघाट -500/-
माध्यमिक गट :-
प्रथम -रेवती  बोड्रे – नंदुरबार -1000/-रोख.
द्वितीय-स्वरदा कोरान्ने -नागपूर -700/-
तृतीय-आदया पोतदार -नागपूर -500/-
उत्तेजनार्थ:-
अक्षय चारभाई -नागपूर-300/-
श्रुती सरोदे -300/-
शिक्षक गट :-     
प्रथम -मनोज गायकवाड – खापरखेडा -3000/-
द्वितीय-प्राजक्ता जोशी- नागपूर -2000/-
तृतीय-प्राची मूळे – नागपूर -1000/-
उत्तेजनार्थ:-
अवंती देशपांडे -500/-
जयश्री गोखले – 500/-
इत्यादी सर्व स्पर्धकांना भरघोस  बक्षिसे देण्यात आली. online बक्षीस समारंभाचे संचालन शाळेच्या शिक्षिका सौ.उत्कर्षा महाजन यांनी केले. समारोप अश्फाक शेख यांच्या देशभक्तीपर गायनाने झाला. या स्पर्धेसाठी परिक्षणाचे काम राजेन्द्र भावे मुंबई आणि डॉ. सौ.शीला कुलकर्णी नागपूर यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष रवीन्द्र फडणवीस तसेच संस्थेच्या .सौ सीमा फडणवीस आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.राजश्री किनखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.