Home Breaking News महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

183 views
0

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर : नाभिक समाजातील संत श्रेष्ठ नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम दी. २-११-२०२० ठीक अकरा वाजता तपस्या विद्या मंदिर येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष श्री सतीश तलवारकर यांच्या अध्यक्षतेखाली तपास्या विद्या मंदिर उदय नगर सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत श्री मधुकर राव कडू यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी समाज नेते सुरेश चौधरी यांनी संत नगाजी महाराज जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. महामंडळांचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विजय वाटकर यांनी संत नगाजी महाराज यांच्या साहित्य, अभंग, याबाबत विचार व्यक्त केले. महामंडळाचे अध्यक्ष श्री सतीश तलवारकर यांनी संत नगाजी महाराज यांचे महत कार्य समाजप्रबोधनाच्या दृष्टीने मोलाचे असून उत्तरोततर समाजासाठी सेवा घडवून व साहित्य निर्मिती निर्माण होऊन ही ईश्वरचरणी प्रार्थना करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी संत नगाजी महाराज मठाचे सचिव श्री रमेश चौधरी महामंडळांचे विदर्भ उपाध्यक्ष प्रकाश द्रव्यकर महामंडळाचे पदाधिकारी तानाजी कडवे आनंद आंबुलकर विजय कडवे रमेश उंबरकर पुरुषोत्तम द्रव्यकर अजय मांडवकर अमय वाटकर प्रामुख्याने उपस्थित होते.