विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या आंबेडकर महाविवालय डॉ. आंबेडकर मनेजमेंट स्टडीज अन्ड रिसर्च इनिटटयूट दीक्षाभूमी, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्मारक समितीचे माजी सचिव दिवंगत सदानंदजी फुलझेले यांच्या तैलचित्राचे अनावरणाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या दादासाहेब ना.ह.कुंभारे सभागृहात त्यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 नोव्हेबर रोजी, सकाळीच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा.भूषणजी गवई यांच्या शुभहस्ते स्मारक समिती, भदन्त आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यासंगी नागपूर चे महापौर संदीप जोशी, रामटेक मतदार संघाचे खासदार मा.कृपालजी तुमाने, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, स्मारक समिती डॉ.सुधीर एस.फुलझेले, सदस्य अॅड. आनंद एस. फुलझेले, राजेंद्र गवई, एम.आर.सुटे,  विलास गजघाटे, डॉ.आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रा.श्रीमती बी.ए.मेहरे प्रामुख्याने उपस्थित होत्या. कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या नियमानुसार आवश्यक ती सर्व काळजी
घेऊन हा कार्यक्रम आयोजित पार पडला. या प्रसंगी एन.आर.सुटे सदस्य स्मारक समिती यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी दिवंगत सदानंदजी फुलझेले यांच्या कार्याचा गौरव करीत आप आपल्या आठवणींना उजाळा दिला. विलास गजघाटे यांनी प्रास्तविक सादर केले. तर सुधीर फुलझेले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला डॉ.आंबेडकर महाविद्यालय व डॉ.आंबेडकर मैनेजमेंट स्टडीज अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट महाविद्यालया तील शिक्षक व शिक्षकेत्तेर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच दिवंगत फुलझेले साहेबांचे संपूर्ण कुटुंब देखील यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्वश्री चंद्रहास सुटे. मधुकर मेश्राम, शरद मेश्राम, निळू भगत, पापा मुल, देवाजी रंगारी, प्रमोद गेडाम यांचे सह नागपूरातील प्रतिष्ठित नागरीक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. अरूण जोसेफ, डॉ.मुजाहिद सिद्दीकी, आशिष द्विवेदी, प्रशांत निखारे, मनोज राउत, उमेश पाटील, प्रसन्न मुल, सिध्दार्थ महेशकर यांनी हा कार्यक्रम यशस्ववीरित्या अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed