ओबीसीचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक 

188
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर प्रतिनिधि : प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्या अध्यक्षतेत व प्रा. दिवाकर गमे, संचालक महाज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत विदर्भातील पदाधिकारी  उपस्थित राहतील.
ओबीसीच्या न्याय मागण्या, समाजातील विविध घटकांना भेडसावणाऱ्या अडचणी, सध्या असलेले आरक्षण, आगामी जनगणना यासह ओबीसी समाजातील विविध समस्यांवर चर्चा व चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलची विदर्भ स्तरीय चिंतन बैठक आज दि. २ नोव्हेंबरला नागपूर राहुल काॅम्पलेक्स, गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. या विदर्भस्तरीय चिंतन बैठकी ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, विदर्भ प्रभारी व निरीक्षक प्रामुख्याने उपस्थित राहतील. या बैठकीला प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि विदर्भातील ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते यांची उपस्थिती देखील राहणार आहे. एकूण जनसंख्येत सुमारे 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाला अद्याप न्याय मिळालेला नाही ? ओबीसीच्या मागण्या कायम आहेत ? ओबीसी समाजाच्या मागण्या कायम ठेवून त्याचा वोटबँक म्हणून काही धर्मवादी राजकीय पक्षांनी वापर केला. ओबीसी समाजातील बेरोजगारी, आर्थिक विकास, त्यांच्या शिक्षणासाठी सवलती यासहीत बैठकीत ओबीसी समाजाच्या विविध मागण्या, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, राज्य व केंद्र सरकारने नोकरी, शिक्षण व विविध ठिकाणी लागू केलेल्या आरक्षण, यासोबतच येत्या वर्षात होणारी देशाची जनगणना व त्यात जातीय जनगणनेवर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. या बैठकीत चर्चा करण्यासाठी विदर्भातील सर्व ओबीसी पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे विदर्भ विभागीय अध्यक्ष सतिश इटकेलवार यांनी केली आहे.
दुपारी 12 वा. पत्रकार परिषद होणार आहे कृपया नोंद घ्यावी.