Home Breaking News दिवंगत सदानंदजी फुलझेले यांच्या फोटोचे अनावरण दिक्षाभुमी महाविद्यालयच्या सभागृहात आज……

दिवंगत सदानंदजी फुलझेले यांच्या फोटोचे अनावरण दिक्षाभुमी महाविद्यालयच्या सभागृहात आज……

88 views
0

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.मा.भूषण गवई यांच्या शुभ हस्ते श्री. सदानंदजी फुलझेले यांच्या फोटोचे अनावरण उदया डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ना. ह. कुंभारे सभागृहात….
नागपूर : ( दि. ३१ ऑक्टो )
परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे माजी सचिव, दिवंगत सदानंदजी फुलझेले यांच्या फोटोचे अनावरण रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२० रोजी, सकाळी 10:30 वा. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे ना. ह. कुंभारे सभागुहात आयोजीत करण्यात आले आहे. याप्रसंगी स्मारक समितीचे अध्यक्ष, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. भूषणजी गवई यांच्या शुभहस्ते फोटोचे अनावरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, मा. श्री. अनिलजी देशमुख, उर्जामंत्री व नागपूर जिल्हयाचे पालकमंत्री, मा. डॉ. नितीनजी राउत, रामटेक मतदार संघाचे खासदार कृपालजी तुमाने, नागपूरचे महापौर संदीप जोशी, प्रा. जोगेंद्रजी कवाडे, सुश्री सुलेखाताई कुंभारे प्रामुख्याने उपस्थित राहतील. उपरोक्त कार्यकमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे. असे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी कळविले आहे.