
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर
सहा ऋतू तिन्ही काळ
जीवनाचा काला
धरणीच्या भेगासम
सोसायच्या कळा
मृगजळ नाचवते
आशेच्या झुल्यात
सरी गेल्या तडकून
ढगाच्या पोटात
पेरलेले बीज उले
पुन्हा नांगरणी
खोल डोह डुबायला
ऋणातल्या ऋणी
जीव जरी पोसतात
पिकविता मोती
तरी माझी जिंदगानी
विंचवाच्या हाती
रानातल्या आधाराला
येई पशूधन
प्रकाशेल आसमंत
नव्या वाटेतून
– तुकाराम खिल्लारे

