
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, नागपूर : (दि. ३१ ऑक्टो )
नागपूर शहरातील संत्रानगरीत प्रथमच ३० ऑक्टोंबर रोजी आगमन झाल्यामुळे मा. परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य अविनाश डाकणे यांचे संत्रा नगरीत आगमना प्रित्यर्थ – महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे स्वागत करून सदिच्छा भेट घेऊन, वाहतूक दारांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली व त्यावर लेखी नोंद घेऊन ताबडतोब निर्णय घेऊ, असे आश्वासन व ग्वाही आयुक्त साहेबांनी दिली. याप्रसंगी प्रामुख्याने वाहतूक सेनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष श्री. सचिन भाऊ धोटे, राज्य सरचिटणीस मा. हेमंत गडकरी, विपीन धोटे, नरेंद्र (गुड्डू भाऊ) मिश्रा, प्रशिक खांडेकर, देवेंद्र जैन साहेब, मंगेश शिंदे, बागडे गुरुजी, युवराज तळेगावकर, प्रवीण गायकवाड, प्रभुदास डोंगरे, सोपान राऊत काका, अमर भारद्वाज, संदीप धांडे, नितीन भुजाडे यावेळी उपस्थित होते.

