
विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल: अमरावती प्रतिनिधी प्रमोद निर्मळ: अमरावती : येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराई उद्यान लोकांच्या सदृढ आरोग्य बनावे तसेच निवांत बसण्याकरिता एक निसर्गाचा आनंद मिळावा याकरिता वनराई उद्यान सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तीन हजार वृक्ष लागवड केलेली आहे. जवळपास 45 प्रकारच्या प्रजाती या उद्यानामध्ये आहे सर्व वृक्षांना क्रमांक व त्यांच्या नावाची पाटी लावून वृक्षांना नाव दिले आहे. या गावाला आतापर्यंत संत गाडगेबाबा पुरस्कार, निर्मलग्राम पुरस्कार, तंटामुक्ती पुरस्कार स्मार्ट ग्राम पुरस्कार, वनराई पुरस्कार, राज्यपाल पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहेत.

