शाळा आपल्या दारी – एक अप्रतिम उपक्रम

विस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5506 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

343

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल– वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप सुरोशे – वाशिम : किरकोळ वस्तूची विक्री करून रस्त्याच्या कडेला पाल ठोकून वास्तव्य करणा-या लोकांच्या मुलाला शिक्षणाचा प्रवाहात आणण्याचे कार्य महिला पोलीस विभागात कार्यरत असलेल्या संगीता मारोती ढोले यांनी केली. वाशिम शहरातील पुसद नाका रोड वरील शेलुबाजार फाट्या लगत हातावर पोट असणारे काही कुटुंब पाल ठोकून राहतात या कुटुंबातील जवळपास 30 ते 35 मुले मुली शाळा बाह्य आहेत तसेच त्यांच्या पैकी काही मुले मुली रत्यालगत फिरत होती. या कुटुंबातील लोकांची आणि त्यांच्या मुलांची सत्य कहानी माहित झाल्यावर गेल्या पाच ते सहा महिन्यापासून संगीता ढोले त्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी धडपडत आहेत. शाळाबाह्य मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी त्यांच्यावर संस्कार घडवण्यासाठी शिक्षणासोबत संस्कार वर्ग चालवतात तसेच त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व आणि सोबत कर्मकांड अंधश्रद्धा व्यसनमुक्तीसाठी शर्तीचे प्रयत्न आणि मार्गदर्शन करण्याचे काम महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले या करत असतात या प्रसंगी मुलांना शैक्षणिक साहित्य व पोशाख देऊन त्या मुलांचा आत्मविश्वास वाढवला या शाळा आपल्या दारी या अंतर्गत संबंधीत मुला मुलींना शिक्षणाचा प्रवाहात आणण्यासाठी सतत धडपडणा-या पोलीस महिला संगीता ढोले यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे सोशल डिस्टेंसिंग अंतर राखून शिकवतात आपली रोजची ड्युटी करून फावल्या वेळात त्या मुलां मुलीचे वर्ग परिसरात तंबू मध्ये घेतात या त्याच्यां कामगिरी बदलं शिक्षक दिनी त्यांना सलाम.