Home महाराष्ट्र शब्दालंकार साहित्य मंडळातर्फे दस-याच्या शुभमुहूर्तावर स्त्रीशक्तीचा सत्कार

शब्दालंकार साहित्य मंडळातर्फे दस-याच्या शुभमुहूर्तावर स्त्रीशक्तीचा सत्कार

0
शब्दालंकार साहित्य मंडळातर्फे दस-याच्या शुभमुहूर्तावर स्त्रीशक्तीचा सत्कार

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल: मुंबई प्रतिनिधी – मुंबई : शब्दालंकार साहित्य मंडळा तर्फे आधुनिक युगातील देवी माँ हा उपकम घेण्यात आला. ह्या उपक्रमाची संकल्पना अशी आहे की आजच्या काळातील परिस्थितीशी सतत लढत राहणा-या ज्या माझ्या माता, भगिनी, सखी आणि कन्या आहेत त्याच ख-या अर्थाने आधुनिक काळातील देवी माँ आहेत. आपल्या मंडळाचा हेतू हाच आहे की त्यांचा सत्कार करणे आणि दस-या सारखा अजून दुसरा तो कोणता शुभ मुहूर्त मिळणार त्यांचा सत्कार करण्यास म्हणुन दस-याच्या दिवशी संध्याकाळी हा सत्कार सोहळा शब्दालंकार ह्या ग्रुपवर साजरा केला. न भूतो न भविष्यती असे ह्या सोहळयाचे वर्णन केले तर ते वावगे ठरणार नाही असे शब्दालंकार साहित्य मंडळाच्या अध्यक्षा नेहा धारुळकर यांनी आपले मत व्यक्त केले तसेच साहित्य मंडळाच्या उपाध्यक्षा सौ. संगीता पाध्ये ह्यांनी आपल्या सुरेल आवाजात सूत्रसंवादन करून रसिकांची मने जिंकली.
खालील सत्कार मूर्तींचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला-
1) जीवनदायिनी माँ
1. डॉ. निद्धी बक्षी, दिल्ली, 2. डॉ. निक्की बक्षी, दिल्ली
2) अन्नपूर्णा माँ
1 सौ. अंकिता बोळींजकर, बोळींज, 2. सौ. मंजिरी देशपांडे, चंद्रपूर
3) ज्ञानवर्धिनी माँ
1. सौ. हर्षा पाटील, विरार, 2. सौ. विद्या बोरुलकर, अंधेरी
4) समाज सुधारीणी माँ
1. सौ. संगीता पाध्ये, विरार, 2. सूचिता शिर्के, नवी मुंबई
5) कायदा सल्लागारीणी माँ
1. नेहा धारुळकर, विरार, 2. अर्चना जैन, विरार
6) निसर्ग संरक्षिणी माँ
1. सौ. निलम पाटील. वसई, 2. सौ सुजाता कवळी, विरार
7) तंत्रज्ञान विकसिनी माँ
1. मिस. राधिका धारूळकर, 2. मिस. मनीषा ताजने, डहाणू
8) देश रक्षिणी माँ
1. सौ. उर्मिला पाटील,
9) सुरक्षाकवच प्रदायिनी माँ
1. सौ. संगीता माने, सातारा 2. सौ रेखा देशपांडे, कोकण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here