Home दिन विषेश रा.सु.गवई यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त अभिवादन

रा.सु.गवई यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त अभिवादन

0
रा.सु.गवई यांच्या 91 व्या वाढदिवसानिमित्त अभिवादन
विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर शहर प्रतिनिधी – नागपूर –परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती डॉ.आंबेडकर महाविद्यालय व डॉ. आंबेडकर मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट दीक्षाभूमी नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्मारक समितीचे माजी अध्यक्ष व बिहार व केरळ राज्याचे माजी राज्यपाल दादासाहेब रा. सु.गवई यांच्या 91 व्या वाढदिवसा निमित्त आज 30 ऑक्टोबर ला महाविद्यालयाच्या सभागृहात दादासाहेबांच्या फोटोला स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सु रे ई ससाई यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर फुलझेले सचिव, स्मारक समितीचे सदस्य सर्वश्री एन. आर. सुटे, विलास गजघाटे डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. श्रीमती बी.ए.मेहरे यांच्या उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थितांनी दादासाहेबांच्याबद्दल आप आपल्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी डॉ. आंबेडकर महाविद्यालय व डॉ. आंबेडकर मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तेर कर्मचारी व सर्वश्री चंद्रहास सुटे, मधुकर मेश्राम, शरद मेश्राम, निळू भगत, पापा मुल, देवाजी रंगारी, प्रमोद गेडाम, केवळ कांबळे हे देखील यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here