दक्षता जनजागृती सप्ताह 2020

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5498 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

316

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर
केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दि. २७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर या दरम्यान सतर्क भारत समृद्ध भारत ही संकल्पना घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणू व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावरील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने अनेक प्रतिबंध लावले आहेत. अशा परिस्थितीत दक्षता जनजागृती सप्ताहाच्या आयोजनावर अनेक मर्यादा आल्या. वरील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे व्यापक जनजागृती होण्याच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ विचारवंताचे मनोगत आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचविणे व मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येतील,भ्रष्टाचाराविरूध्द करण्यात येणा-या जनजागृतीसाठी सहकार्य करावे. तसेच ज्येष्ठ विचारवंताचे मनोगत आणि त्यांच्या मुलाखती घेऊन संपादकांनी प्रकाशित करावे असे अप्पर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांनी पत्रकाद्वारे निवासी संपादकांना कळविले आहे.