काटोल मतदार संघातील जनतेकरिता ६ रूग्णवाहिका सज्ज

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5490*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

308

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर जिल्हा प्रतिनिधी : काटोल – वसंतराव देशमुख प्रतिष्ठान व कोशिश फांऊंडेशन यांच्या सौजन्याने व सोल्जर इंडस्ट्रीज इंडिया लि. यांच्या सहकार्याने काटोल मतदार संघातील जनतेकरिता ६ रूग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा २५ ऑक्टोबर रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सत्यनारयणजी नुवाल उपस्थित होते तर स्वागताअध्यक्ष मा. श्री. गृहमंत्री महाराष्ट्र राज्य अनिलबाबू देशमुख उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष पद मा. श्री. गोविंदलाल भुतडा यांनी भुषविले होते. कार्यक्रमात सोल्जर इंडस्ट्रीज इंडिया लि चे अध्यक्ष सत्यनारयणजी नुवाल यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.