नगर अंदाज आणेवारी व सुधारीत आणेवारीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5481*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

297

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल: यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रा. सचिन दुल्लरवार – यवतमाळ: मौजे रूई (वाई) ता.जि. यवतमाळ येथील काही शेतक-यांनी नगर अंदाज आणेवारी व सुधारीत आणेवारी प्रक्रिया पारदर्शकरित्या व प्रत्यक्ष शेतक-यांच्या बांध्यावर जावून करण्याकरीता मा. जिल्हाधिकारी साहेब, यवतमाळ यांचेकडे निवेदन दिले, कारण तलाठी व मंडळ अधिकारी यांनी एका छापील नमुन्यावर सदर प्रक्रिया कागदोपत्री केल्याचे दिसून आले आहे व त्यावर ग्राम पैसेवारी समिती मधील शेतक-यांच्या सहया घेवून कागदोपत्री अहवाल संबंधीत तहसिलदार यांच्याकडे सादर करण्यात येते असे लक्षात आले आहे व त्यामध्ये सुधारीत आणेवारी 51 पैसे दाखविण्यात आली आहे. अश्याप्रकारे इतर गावामध्ये तालुक्यात, लिळयात व राज्यात देखील आणेवारीची प्रक्रिया कागदोपत्री केल्याची दाट शक्यता असू शकते व त्यामुळे शासकीय कामात पारदर्शकता राहत नाही. त्यामुळे त्यांना शासकिय मदतीपासून वंचित रहावे लागते व परिणामी शेतक-यांचे नुकसान होते, म्हणून आणेवारी प्रक्रिया पुन्हा प्रत्यक्ष शेतक-यांच्या बांध्यावर जावून सुरू करावी व त्याकरीता संबंधितांना निर्देश दयावे अशी विनंती शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना केलेली आहे. सदर निवेदन देतेवेळी सदर पैसैवारी समितीचे सदस्य व प्रगतीशिल शेतकरी आकाश ढेकाळे, शेतकरी-वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शाह, बाळु राठोड पंचायत राज संघटना जिल्हा सचिव, अॅड. दिनेश वानखेडे जिल्हाध्यक्ष काॅंग्रेस लिगल सेल, अॅड. अक्षय हराळ, तालुकाध्यक्ष काॅंग्रेस लिगल सेल, प्रा. सचिन दुल्लरवार व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.