Home क्राइम जगत गोंदिया जिल्हयातील नागरीकांनो सावधान ! शहरात तोतया सी आय डी सक्रिय

गोंदिया जिल्हयातील नागरीकांनो सावधान ! शहरात तोतया सी आय डी सक्रिय

0
गोंदिया जिल्हयातील नागरीकांनो सावधान ! शहरात तोतया सी आय डी सक्रिय

विदर्भ वतन न्युज पोर्टल : गोंदिया जिल्हा प्रतिनिधी राधाकिसन चुटे,

गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात दिवसेदिवस चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नकली सीआयडी आँफीसर बनून आलेल्या दोन व्यक्तींनी गोंदिया शहरातील फुलचूरमध्ये मोबाईलसह लाखो रूपयाचे सोन्याचे आभुषणाची फसवणूक करीत फरार झाल्याची घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनानेसुद्धा तोंडावर बोट ठेवले असून ग्रामिण भागात तोतया सीआयडी आँफीसरची टोळी सक्रीय असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
गोंदिया- आमगाव महामार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ धनसिंह कोचे हे आपल्या दुचाकीने जात असताना दरम्यान मोटारसायकलने एक व्यक्ती त्याच्याजवळ येवून शिटी वाजवूनसुद्धा गाडी थांबवित नाही का ? असे म्हटल्यानंतर धनसिंह रस्त्याच्या कडेला आपले वाहन उभे केले. तोतया सीआयडी आँफिसरने नकली ओळखपत्र दाखवून आपण सीआयडीकडून असल्याचे सांगितले. शहरात चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे आपण चेकींग करीत असल्याचे सांगितले दरम्यान पुन्हा एक व्यक्ती त्याठिकाणी येवून धनसिंहकडील मोबाईल, सोन्याची चैन, कडा, अंगठी व इतर साहित्य रुमालात बांधून गाडीच्या डिक्कीत ठेवले. काही अंतरावर गेल्यावर धनसिंहने गाडीची डिक्की खोलून पाहीली असता त्यात कोणतेही साहित्य आढळून नाही तेव्हा धनसिंहने ग्रामिण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. सदर तक्रारीवरून पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here