आमदार देवेन्द्र भुयार यांच्या हस्ते राजुरा बाजार येथे पशुधन लसीकरणाचा शुभारंभ !

480

विदर्भ वतन न्युज पोर्टल, वरुड तालुका प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी पशुपालन हा महत्त्वाचा मार्ग आहे. जर पशुपालकांना अधिकचा नफा हवा असेल तर आपल्याला जनावरांची योग्य काळजी आणि निगा ठेवावी लागते. योग्यवेळी जनावरांना लस देणे आवश्यक आहे. गाई, म्हशी व शेळ्या मेंढ्या हे पाळीव प्राणी घटसर्प, फऱ्या व आंत्रविषार यासारख्या विविध साथीच्या रोगांमुळे तडकाफडकी मरण पावतात. या रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे जनावरे दगावतात व पशुपालकाचे फार मोठे नुकसान होते. या सगळ्या परिस्थितीमुळे पशुपालकास फार मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागते या रोगांमुळे शेतकाऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान होऊ नये म्हणून राष्ट्रीय पशु रोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत राजुरा बाजार येथील पशु वैद्यकीय दवाखाना येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत लसीकरण शिबिर आयोजित करून जनावरांना लस लावून टॅगिंग करण्यात आले. यावेळी तोंडखुरी व पायखुरी रोगनिर्मूलन माहिती पुस्तकाचे विमोचन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच रोग निर्मूलन, करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पशुपालकांनी अधिकाधिक पशूंचे लसीकरण तसेच टॅगिंग करण्याचे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.
यावेळी आमदार देवेन्द्र भुयार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाराव बहुरूपी, जी.प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, प. स. सदस्य सिंधुताई कर्नासे, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ चंद्रशेखर गिरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ रहाटे, पशुसंवर्धन पर्यवेक्षक डॉ खेरडे व डॉ दवंडे, पशुधन पर्यवेक्षक डॉ जाधवर, लसीकरण सहाय्यक बेले,माजी सरपंच किशोर गोमकाळे, सुधाकरजी डाफे, भानुदासजी भोंडे, बाबारावजी, मांगुळकर, प्रशांत बहुरूपी, विकास भोंडे, राहुल श्रीराव, गणेश चौधरी, मुकेश लिखार, हर्षल बहुरूपी, गिरीश विरुळकर, अमित साबळे, सागर राऊत, प्रफुल्ल सोनारे, निलेश गोमकाळे, अमित भोंडे, राहुल सोनारे,मंगेश तट्टे, कृष्णा धुर्वे आदी प्रामुख्याने उपस्थित होते .