Home Breaking News दिवंगत मामासाहेब सरदार यांच्या विसाव्या निर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

दिवंगत मामासाहेब सरदार यांच्या विसाव्या निर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

66 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर : दिवंगत मामासाहेब सरदार यांच्या निवासस्थानी रामबागेत बुधवारी, भावभीनी श्रद्धांजलि चा कार्यक्रम प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. विशेष म्हणजे सरदार यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संपूर्ण साथ दिली. ते अत्यंत परोपकारी स्वभावाचे होते. रंजल्या-गांजल्या दुःखा करिता नेहमी धावून यायचे. यावेळी अँड. सुरेश घाटे व प्रा. राहुल मून यांनी मामासाहेब यांच्या कार्याचा गुणगौरव श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बुद्धबंधुनी बुद्धवंदना, बुद्धपूजा विधी भिक्खुनी प्रजापती गौतमी यांच्याद्वारे बौद्ध पुजा विधी घेण्यात आली. मामासाहेब सरदार यांनी आंबेडकरी आंदोलना मध्ये आपल्या कुटुंबाची पर्वा न करता समर्पित भावनेने कार्य केले. प्रसिद्ध समाजसेवक ऐतिहासिक लाँगमार्च नेते, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते, तसेच माजी नगरसेवक, यांच्या लॉगमार्च चौक रामबाग येथे त्यांच्या स्मृती भावभीनी आदरांजली अर्पित करण्यात आली. व श्रद्धांजली व त्यांच्या फोटोला माल्यार्पण अर्पण करण्यात आले. उपरोक्त कार्यक्रमा प्रसंगी इमामवाडा व वस्तीतील  सुमनबाई सरदार, चरणदास गायकवाड, बेबीताई गायकवाड, उषाताई कांबळे, वैशाली सरदार, प्रमिलाताई भगत, आशा सरदार, सुप्रिया सरदार, शिला धाकडे,  मोना तागडे, प्रमिला वाणी, संगीताताई  ई. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धर्मपाल सरदार, उत्कर्ष कांबळे, आदर्श कांबळे, धर्मपाल धाबर्डे, राजू कांबळे, मनीष गायकवाड, राकेश वाघमारे, अनिल शेंडे, अमन इंगळे इत्यादींनी परिश्रम घेतलेत.