व्ही.एन.आई. टी सुरक्षा रक्षक राजनीतिक षडयंत्राचे बळी ………

283
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल
व्हीएनआयटी कंत्राटी सुरक्षा रक्षक कर्मचारी संघाच्या अंतर्गत आज पत्र परिषदेच्या माध्यमातून व्ही.एन.आई. टी. मधील सुरक्षा रक्षक ८ ते १० वर्षा पासून काम करीत आहेत. संपूर्ण परिसराची माहिती जुन्या सुरक्षा रक्षक यांना आहे. कंत्रादार बदलले परंतु सुरक्षा रक्षक बदलले गेले नाही. मागील कंत्राटदार
एस.आय.एस. कंपनी होती. कोरोना संकट असून सुद्धा व्ही.एन.आई. टी. प्रशासनाने आरमोर नामक कथित कंपनीला कंत्राट दिले. आरमोर कंपनीचे संचालक आशिष पांडे भा. ज.यू.मो.चे उपाध्यक्ष असून जुन्या १७० सुरक्षा रक्षक यांना नियमांची पायामल्ली करून कार्यमुक्त करून पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यामधूनच नवीन अनुभवातील लोकांची नेमणूक केली. राष्ट्रीय स्तरातील शिक्षण क्षेत्र असल्यामुळे शांतीचे मार्गाने लढा सुरू आहे. परंतु आशिष पांडे नामक संचालक राजनीतिक दवाब किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून पोलिसी खाक्याचा सुद्धा वापर केल्या जात आहे. व्ही.एन.आई.टी. व्यवस्थापक सुद्धा नवीन कंत्राटदाराचा पक्ष घेताना दिसतात. काही प्रमाणात आर्थिक घोळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व सुरक्षा रक्षक यांना उपासमारीची वेळ आली असल्यामुळे सी.आय.टी.यू. त्यांना परत कामावर घेण्याची मागणी करीत आहे. कोरोना मुक्त भारत अशी घोषणा पंतप्रधानांनी अजून केलेली नाही. व्ही एन आई टी व्यवस्थापक डॉ. पडोळे यांनी त्वरित मार्ग काढावा अन्यथा सी.आय.टी.यू .पूर्ण ताकतीने व्हीएनआईटी, गेट समोर तीव्र आंदोलन करणार. काही अनर्थ घडल्यास डॉ. पडोळे जिम्मेदार राहणार. असे मत VNIT चे महासचिव दिलीप देशपांडे यांनी पत्रपरिषदेत म्हटले आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युनियन चे अध्यक्ष कॉम.राजेंद्र साठे व सीटू सचिव कॉम.दिलीप देशपांडे यांनी पत्रपरिषद मध्ये हि माहिती दिली.