नाच – सीझन 4 उत्साहात…..

354
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल
अनमोल फाउन्डेशन व अनमोल आर्ट फाउन्डेशन संस्थेच्या वतीने संचालक अनमोल गणेर यांच्या अंतर्गत नाच सीझन 4 (नॅशनल लेव्हल डांस कॉम्पिटीशन) उत्साह नुकताच पार पाडला. गेल्या ३ वर्षापासून नाच सिझन मोठया आनंदाने आयोजित करण्यात येते. हि स्पर्धा विदयार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी म्हणून आयोजित करण्यात येते. यामध्ये भारतीय नृत्य व वेस्टर्न प्रकारचे नृत्य सुद्धा सादर करण्यात आले आहे. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा पण हया वर्षी स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आली. स्पर्धेत न्यु कमर, प्रोफेशनल, क्लासिकल, फोक अशा कॅटेगिरी होत्या. नाच सीझन 4 चे जज म्हणून बीरराधा शेरपा (डांस प्लस 6 चे वीनर स्टार प्लस वाहीनी) नैनिका अनुसुरू व दिपक हुलसुरे (डांस इंडिया डॉन्स 6 चे फायनलिस्ट झी टी.व्ही) यांनी शेवटपर्यंत जजमेंट ची जबाबदारी सांभाळली. स्पर्धेत संपूर्ण भारत देशामधून एकूण १२ राज्य व ३६ शहरांमधून 210 नृत्य गणानी यामध्ये भाग घेतला. या स्पधेत जिंकलेल्या विदयाथ्यांची नावे प्रिशा शहा अहमदाबाद गुजरात, प्रतिक्षा मैसूर कर्नाटका, रिद्धीमा तिवारी भोपाल म. प्र,
श्रेया घोष सातारा, रोहन ताटे परली, रोशन लाडे, किंजल शेलकर, अबोली पडवाळ, निशा पोपटानी, स्नेहा भुयारकर, ओशीन मेश्राम, कामीनी सिंग नागपूर, संदेश लोखंडे वापी गुजरात,  निखील मारक गुहाटी असाम, स्वरा लोणारे वणी, धनिष्ठा कातकर सातारा, रिद्धी राउत वणी , माहीनी हजारे यवतमाळ, देवांगनी सेनापती जजपूर ओडीशा, शबनम खान रायपूर, लोकेश व रोहीत  नागपूर, रूचिका व मिराराणी भुवनेश्वर ओडीशा, असे विजेत्याचे नावे आहेत, जिकंनाऱ्यांना कॅश प्राईजेस, ट्राफी व डिजीटल सर्टिफिकेट देण्यात आली आणि सर्वांनी भाग घेतलेल्या स्पर्धकांना डिजीटल सर्टिफिकेट देण्यात आले. असे एका प्रसिद्धी पत्रकात फाऊंडेशनचे संचालक अनमोल गणेर यांनी म्हटले आहे.