Home राजकारण लडाख आणि सियाचेनच सामरिक समीकरण

लडाख आणि सियाचेनच सामरिक समीकरण

214 views
0

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, प्रतिनिधी  :  कर्नल अभय बाळकृष्ण पटवर्धन (निवृत्त)
भारतीय सेनेतील ८ जम्मू काश्मिर लाईट इन्फन्ट्री बटालियनच्या सुभेदार बाना सिंगनी १९८७मधे
२१,००० फुटांवरील सियाचेन हिम नदीवर पाय रोवून कबजा केल्यावर,”यामुळे भारताला कुठलाही सामरिक
फायदा झालेला नाही. यावर होणारा वायफळ खर्च ताबडतोब थांबवावा आणि तेथून सेना काढून,त्यांच्या
रखरखावासाठी  लागणारी रकम लोक कल्याणासाठी वापरावी”,अशी कोल्हेकुई अनेक तथाकथित संरक्षण
तज्ञ/विचारवंत/सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केली.सियाचेनच्या रखरखवासाठी (स्ट्रॅटेजिक मेंटेनन्स) त्या
काळी,प्रति वर्ष दोनशे कोटी रुपये लागत  असत तर आजमितीला वार्षिक २००० कोटी रुपये लागतात. आजपर्यंत
सर्व सत्ताधारी राजकीय पक्ष,पाकिस्तान/चीनची मनधरणी/लांगूलचालन करण्यासाठी “बॅक डोअर डिप्लोमसी”
या गोंडस नावाखाली “अन ऑफिशियल/अंडर हॅन्ड निगोसिएशन्स”ची मोहीम चालवत असत. २०१६मधे
डोकलाम येथे झालेल्या चीनी घूसखोरीच्या नंतर ही असामरिक प्रथा बंद झाली.
सियाचेन मधून सेना माघारी करण्यासाठी तत्कालीन सरकारनी, ऊर्ध्वलिखीत कोल्हेकुईकरांच्या
दडपणाला बळी पडून २०१०मधे,माजी वायु सेनाध्यक्ष हे चेयरमन आणि जोडीला,माजी राजदूत/वरिष्ठ
प्रशासकीय व लष्करी अधिकारी/विचारवंत क्षेत्रातील ११ सदस्य असलेली एक समिती स्थापन
करून,वाटाघाटींची प्रक्रिया सुरू देखील केली.बहुदा; तत्कालीन सरकार आणि डाव्या विचारसरणीच्या समितीला,
तेंव्हा प्रचलित असलेल्या परराष्ट्रीय तुष्टीकरण धोरणांतर्गत, सियाचेनच्या सामरिक महत्वाचा विसर पडला
असावा. पण लडाख/सियाचेनच्या सामरिक समीकरणाची पूर्ण जाणीव असलेल्या माजी लष्करी अधिकाऱ्यांच्या
प्रखर विरोधामुळे सरकारला ही मोहीम बंद करावी लागली. ०५ मे,२०२०ला लडाखमधे झालेल्या आणि अजूनही
अस्तित्वात असलेल्या चीनी घूसखोरीमुळे, सियाचेन हिमनदीच सामरिक महत्व आणि लडाख/सियाचेन मधील
सामरिक समीकरण परत एकदा उजागर झाल आहे.
श्योक व नुब्रा खोऱ्यांच्या उत्तर पश्चिमेला असलेली सियाचेन हिमनदी आणि  लदाखमधील काराकोरम
पर्वत शृंखला/काराकोरम खिंड,दौलत बेग ओल्डी विमानतळ/पठार त्याच प्रमाणे,दरबुक- श्योक-दौलत बेग ओल्डी
हा संरक्षण विषयक दळणवळणाच्या दृष्ट्टीनी महत्वाचा दुवा असणार श्योक खोर यांच्यातील सामरिक समीकरण;
सैनिक/संरक्षणतज्ञ सोडल्यास इतरांच्या सुलभ आकलना पल्याड आहे.२४ ऑगस्ट,२०२०ला पाकिस्तानच्या ‘द
नेशन’ या प्रमुख वृत्तपत्रात, ”सियाचेन इज अवर्स” या मथळ्याखाली तेथील ब्रिगेडियर स्तराच्या लष्करी
अधिकाऱ्यानी लिहिलेला लेख वाचल्यावर,या संदर्भातील  पाकिस्तानी संरक्षण तज्ञ/विचारवंत यांची विचारसरणी
पाकिस्तानच्या सामरिक हिताची असल्याच प्रत्ययाला येत.‘द नेशन’ मधील लेखात पाकिस्तानी सेनाधिकाऱ्यानी;
अ) फाळणीनंतर पॉईंट एनजे ९८४२पासून काराकोरम खिंडीपर्यंतच क्षेत्र नेहमीच पाकिस्तानकडे होत,ब)
१९८७पर्यंत,सियाचेन झोनमधील पर्वतराजींवर चढण्यासाठी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक नेहमीच पाकिस्तान
सरकारची परवानगी घेत असत,क) नॅशनल जॉग्राफिकच्या नकाशांमधे, हे पाकिस्तानच क्षेत्र म्हणूनच दर्शवल्या

2

जात असे  आणि ड) बहुतांश जागतिक/ आणि काही भारतीय पुस्तकांमधे सियाचेन त्रिकोण पाकिस्तानी क्षेत्र
असल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत; या चार मुद्द्यांवर जोर दिला आहे.मात्र, लडाख सियाचेनच्या सामरिक
समीकरणाबाबत अनभिज्ञ असलेले तथाकथित भारतीय विचारवन्त/धोरणकर्त्ते/सामरिक/आर्थिक तज्ञ,चीन
पाकिस्तानच्या आक्रमक डावपेचांना दृष्टीआड करून,सियाचेनमधून होणाऱ्या सेना माघारीमुळे भारतावरच
आर्थिक दडपण कमी होईल,याचीच टिमकी वाजवत असत/वाजवतात.
खरी वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे.अ) पहिल्या भारत पाक युद्धानंतर तत्कालीन युद्धबंदी रेषा:सीझ फायर
लाईन,सांप्रत “लाईन ऑफ कंट्रोलच्या  आखणीसाठी झालेल सर्वेक्षण आणि त्यानंतर  ०१  जानेवारी,१९४९ला
झालेल्या  द्विपक्षिय करारामधे “युद्ध बंदी रेषा पॉईंट एनजे ९८४२ पर्यंतच आखल्या गेली असून त्यानंतर ती पॉईंट
एनजे ९८४२च्या पल्याड सरळ उत्तरेकडे काराकोरम खिंडीपर्यंत जाईल” अस नमूद करण्यात आल होत/आहे.ती
आजही तशीच राहिली असती पण त्या काळी गिलगिट बाल्टिस्तानमधील सेना प्रमुख,ब्रिगेडियर (नंतर सेनाध्यक्ष)
परवेझ मुशर्रफला,पॉईंट एनजे ९८४२- साल्टोरो रिज लाईनवरील इंद्रा कोल-काराकोरम खिंडीच त्रिकोणी क्षेत्र
ताब्यात घ्यायच होत आणि त्यानुसार पाकिस्तानी सेनेची व्युह रचना आखल्या जात होती. भारतीय सेनेनी त्वरा
करत  १३ एप्रिल,१९८४ला सियाचेनच्या त्या त्रिकोणी क्षेत्रावर कबजा करून,ती व्युह रचना अमलात येण्या
आधीच मुशरर्फच्या कुटील धोरणाचा फज्जा उडवला; ब) या क्षेत्रातील गिर्यारोहणासाठी अनेक गिर्यारोहकांनी
फक्त भारताचीच  मंजूरी घेतली आहे; क) नॅशनल जॉग्राफिकनी हे केवळ काही वेळाच केल झाल पण भारताच्या
तक्रार/निषेधानंतर  चूका दुरुस्त  करण्यात आल्या आणि ड) या प्रकाशकीय चूकी बाबत भारतानी
लेखक/प्रकाशकांकडे तक्रार केली आहे. जरी पुस्तक मागे घेण्यात (विड्रॉ फ्रॉम मार्केट) आली नसली तरी पुनरावृत्तीत
हि चूक सुधारण्यात आली.
“नॉट ए ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज देअर” या १९६२पासून प्रचलित असलेल्या
सिद्धांतानुसार,सियाचेन/लडाखच्या सामरिक समीकरणाच्या महत्वाकडे भारत सरकारनी १९८४पर्यंत दुर्लक्ष
केल्याच प्रत्ययाला येत. पाकिस्तानला सियाचेन काबीज करायच आहे ही शंका भारताच्या मनात १९८५-८६मधे
आली कारण त्या सुमारास,आयएसआयनी युरोपियन मार्केटमधून हाय अल्टिट्यूड वॉरफेयर गेयर/क्लोदिंग/
इक्विपमेंट खरेदी करण सुरू केल होत.सियाचेनच त्रिकोणी क्षेत्र, १९६३मधे पाकिस्ताननी चीनला  आंदण दिलेल्या
शक्सगाम खोऱ्याला आणि त्याहून महत्वाच म्हणजे दौलत बेग ओल्डी पठाराला देखील  लागून असल्यामुळे,
सियाचेनवर बसलेल्या पाकिस्ताननी नुब्रा खोऱ्यामार्गे येऊन दौलत बेग ओल्डी पठार हस्तगत केल्यास,गिलगिट
बाल्टिस्तानच्या  स्कार्डूपासून अक्साई चीन पर्यंतच सर्व क्षेत्र पाकिस्तानच्या ताब्यात जाऊन त्याची सीमा चीनशी
संलग्न होईल  आणि त्या दोघांच्या एकत्र सांगडी/आक्रमणासमोर नुब्रा व श्योक खोऱ्यातील डिफेन्सेसना  तग धरण
कठीण होईल या सामरिक सत्याची आणि समीकरणाची जाणीव,तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल कृष्णास्वामी
सुंदरजी यांना होती.गिलगिट बाल्टिस्तान स्थित पाकिस्तान स्पेशल सर्व्हिस ग्रुप हल्ल्याची तयारी करतो आहे
याची माहिती इंटलिजन्स एजन्सींनी;१९८७च्या सुरवातीला दिली.पाक एसएसजीचे कमांडो हिमनदी क्षेत्रात
आहेत याची खात्री होताच,सेनाध्याक्षांनी एप्रिल ८७मधे,सियाचेनच्या बिलाफोंड ला (ला म्हणजे खिंड) वर

3

हेलिकॉप्टर द्वारे सैनिक पाठवून/उतरवून संपूर्ण हिमनदीवर तडकाफडकी कबजा केला.एवढ्या उंचीवर झालेल ते
जगातील पहिल युद्ध होत.
आजमितीला चीन दौलतबेग ओल्डी क्षेत्रात ठाण मांडून बसला आहे. त्याच्या सांगण्यावरून जर पाकिस्तान
लडाखमधील  भारतीय संरक्षण फळीच्या (डिफेन्सेस) उत्तरेला असलेल्या शक्सगाम आणि पश्चिमेतील नुब्रा
खोऱ्यांमधे आला तर,पूर्व लडाखमधील भारतीय सैनिकी चौक्यांना चीनी सैनिकी धडकीचा धोका निर्माण होईल
आणि या चीन पाक सामरिक चिमट्यात  (स्ट्रॅटेजिक पिंसर) फसलेल्या/अडकलेल्या भारतीय सेनेला  मोठी माघार
घेत,लेहच्या उत्तर/उत्तर पूर्वेस असलेल्या पर्वतराजींवर (लडाख रेंज) डिफेन्सेस अख्त्यार करावे लागतील. पूर्वी
क्षेत्रातील या सैनिकी माघारीमुळे, लेहच्या दक्षिणे कडील सर्व क्षेत्र नेहमीसाठी  चीन/पाकिस्तानच्या
तोफा/रणगाडे/कमी दूरीची क्षेपणास्त्र  यांच्या माऱ्याखाली येईल याच आकलन,लेह लडाखचा नकाशा/ जमीनीची
मांडणीचे (मॅप/ले ऑफ लँड) अभ्यासक/त्या क्षेत्रातील पर्यटकांसाठी सहज शक्य आहे.२०१३मधे चीननी त्याच्या
महत्वाकांक्षी चायना पाकिस्तान इकॉनॉमीक कॉरिडॉर (सीपीईसी),बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय)
आणि सिल्क रूट (एसआर) प्रकल्पांचा ओनामा केला.”ओल्ड सिल्क रूट नेव्हर डिपेन्डेड ऑन सिंगल आर्टेरी, देअर
वेअर ऑल्वेज मेझ ऑफ देम अँड श्योक रूट हॅड  द पोटेन्शियल टू रिक्रिएट दॅट मेझ” या सत्य वचनानुसार,सांप्रत
सिल्क रूटच्या जोडीला चीन सिल्क रूटचे  पर्याय शोधतो आहे यांची कल्पना,लडाखच्या भूभागाच भौगोलिक
ज्ञान/माहिती असणाऱ्यांना आता येते आहे.मात्र चीन  लवकरात लवकर सिल्क रूटचा पर्याय शोधेल याची पूर्व
कल्पना,सियाचेन आणि पूर्व लडाख क्षेत्रात कार्यरत असलेल्या माझ्या सारख्या माजी सैनिकांना या आधीच
होती.लडाखमधील ताज्या घूसखोरीद्वारे चीन हे साध्य करू पाहतो आहे.
सियाचेन हस्तगत करण्याच मुशर्रर्फी स्वप्न १९८७मधे भंगल्यानंतर २००४-०५पासूनच,सियाचेन क्षेत्रातून
भारत व पाकिस्ताननी एकत्र सेना माघारी करावी (म्युच्युअल विड्रॉल) अशी मागणी पाकिस्तान कडून होऊ
लागली.०७ एप्रिल,२०१२च्या हिवाळयात, पाकिस्तानचे १४० सैनिक,साल्टोरो रीजच्या पश्चिमी उतारावर
झालेल्या प्रचंड मोठ्या हिमस्खलनात एकाच वेळी अल्ला प्यारे झाल्यावर या मागणीला माणुसकीची करुण झालर
लागली.शिवाय हे हिमस्खलन भारताच्या काली नावाच्या सिक्रेट वेपनचा मारा करून करण्यात आल या खोडसाळ
पाकिस्तानी आरोपामुळे, भारतातील अनेक कोमल हृदयी विचारवंतांनी या पाकिस्तानी मागणीला सक्रिय
पाठींबा दिला.मात्र,हे सर्व लोक;म्युच्युअल विड्रॉलच्या मागणी मागील सत्य आणि पाकिस्तानच्या कुटील हेतू
संबंधात अनभिज्ञ होते  किंवा त्यांनी त्या कडे हेतू पुरस्सर डोळे झाक केली होती अस म्हटल्यास ते वावग होणार
नाही.सियाचेन त्रिकोणातील १६० किलोमीटरच्या साल्टोरो रिजलाईनवर फक्त भारतीय सेनाच तैनात होती
आणि आजही आहे.पाकिस्तानी सेना,पश्चिमेकडील उतारांच्या खालच्या बाजूवर (वेस्टर्न लोअर स्लोप्स) तैनात
आहे.
त्यामुळे,या तथाकथित म्युच्युअल विड्रॉल अंतर्गत,सियाचेन/साल्टोरो रीजवरून फक्त भारतीय सेनाच मागे
येईल/माघार घेईल.पाकिस्तानी,पश्चिमेकडील उतारावर असल्यामुळे त्यांनी परत  जाण्याचा प्रश्नच
नव्हता.भारतीय सेनेला सियाचेनमधून माघार घ्यायला लावण्यासाठी म्युच्युअल विड्रॉल हाच एकमेव पर्याय आहे
कारण भारताच्या कबजातील सियाचेन,पाकिस्तानी सेना युद्ध करून कधीच परत घेऊ शकत नाही हे पाक सरकार

4

आणि सेनेला देखील  माहिती आहे. त्यामुळे,ही विचारसरणी आपल्या येथील विचारवंत/सरकारच्या गळी
उतरवण्यासाठी पाकिस्ताननी २००३पासून सियाचेनमधे एकदाही गोळी झाडलेली नाही.इट इज ए स्ट्रेंज केस
ऑफ टोटल सीझफायर देअर बाय द नेशन हू रिझॉर्टस टू फ्रिक्वेंट सीझफायर  व्हॉयोलेशन्स ऑल अलॉन्ग द बॉर्डर.
पाकिस्ताननी सियाचेनवर  हल्ला करण्याच्या केवळ सहा दिवस आधी भारतीय सेनेनी त्यावर कबजा
करून मुशर्रर्फच्या  महत्वाकांक्षेचा धुव्वा उडवला. सियाचेन/साल्टोरो रीजवर आता “ऍक्च्युअल ग्राउंड पोझिशन
लाईन” (एजीपीएल) निर्माण झाली आहे हे पाकिस्तानला मान्य नसल्यामूळे त्यानी ते त्याच्या कुठल्याही नकाशात
दर्शवलेल  नाही.ऊर्ध्वलिखीत उल्लेखानुसार,अक्साई चीन मधील सेनेशी  सामरिक दुवा सांधण्यासाठी  (एस्टॅब्लिश
स्ट्रॅटेजिक कनेक्टीव्हीटी) पाकिस्तानला सियाचेन हव आहे. म्हणूनच,लडाखमधील चीनी घूसखोरीच्या
समर्थनार्थ/आड गिलगिट बाल्टिस्तानमधे दोन डिव्हिजन सेना (४०,००० सैनिक) आणून त्यानी,चीनच्या लढाऊ
विमानांना स्कार्डू विमानतळ वापरण्याची सुविधा दिली आहे.चीनच्या इशाऱ्यावर तो सियाचेन/कारगिलवर
आक्रमण करण्यास सज्ज बसला आहे.चीन,अक्साई चीनमधून लेहकडे आणि पाकिस्तान,गिलगिट बालटिस्तान
मधून कारगिल मार्गे झोझिला खिंडीकडे कूच करेल..या पाक चीनी डावपेचांमुळे लडाख कोअर तीन बाजूंनी घेरल्या
जाईल.त्या दोघांनी लेहचा दरवाजा ठोठावताच उत्तरेकडे चीन पाकिस्तान स्ट्रटेजिक कॉरिडॉर निर्माण
होईल.चीनला देखील ही स्ट्रॅटेजिक कनेक्टीव्हीटी हवीच आहे कारण त्यामुळे त्याच्या; सीपीईसी,बीआरआय आणि
एसआर संकल्पनांचा मार्ग खुला/सुलभ होतो.
पाकिस्तानच्या या खेळीमुळे,भारताला “टू फ्रंट वॉर”ला तोंड द्याव लागेल.अर्थात भारत त्यासाठी सज्ज
आहे.अमेरिकन डिफेन्स सेक्रेटरी मार्क एस्पर आणि सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पॉम्पीओनी ऑक्टोबरमधे,ऍटलांटिक
काउन्सिल समोरील भाषणात या संभावनेची पुष्टी केली असून याला काटशह देण्यासाठी भारत अमेरिकेत आता
“बाईक एक्स्चेंज अँड कोऑपरेशन ऍग्रिमेंट  :बिका” करार होणार आहे.ताज्या इंटलिजन्स इन्पुट्सनुसार,
पाकिस्तानी पंतप्रधान/सेनाध्यक्षांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे आणि चीनी राष्ट्रपतींनी त्यांच्या सेनेला
लडाख मधील  युध्दासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.सियाचेन हस्तगत केल्यास पाकिस्तानला,
काश्मिर/बांगला देशचा बदला घेण्याच समाधान (रिकव्हर लॉस्ट डिग्निटी) मिळेल आणि स्ट्रॅटेजिक कनेक्टीव्हीटी
हासील करण्याची चीनी सामरिक महत्वाकांक्षा देखील पूर्ण होईल.म्हणूनच चीन पाकिस्तानला या साठी
खुला,सर्वंकष पाठींबा देतो आहे.सियाचेन आणि लडाखमधील सामरिक समीकरण आणि मे,२०२०पासून सूरू
असलेल्या  चीनी घूसखोरीला या दृष्टिकोनातून (अँगल) बघण्याची आवश्यकता/गरज आहे.