‘करोना’ संदर्भात आरोग्य जनजागृती

251

सर्वोदय दुर्गोत्सव मंडळ गोरलेपुरा चा स्तुत्य उपक्रम
विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, प्रतिनिधी : प्रमोद निर्मळ अमरावती
सर्वोदय दुर्गोत्सव मंडळ गोरलेपुरा च्या वतीने ‘करोना’ च्या पार्श्वभूमीवर आरोग्य जनजागृती उपक्रमातून दूर्गोत्सव साजरा करत असताना या वर्षी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करुन ना ढोल ना ताशा ना साऊड सामाजिक कार्यक्रम राबबुन मंडळाच्या वतीने उत्सव साजरा करण्यात येत आहे कोरोणा विषयी जनजागृती म्हणुन मास लावा नियमित हात धुवा आपल आरोग्य आपली जबाबदारी . ‘योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार, नियमित व्यायाम, श्‍वसनांचे विविध प्रकार, प्राणायाम आणि योग्य आहार यामुळे ‘करोना’ सारख्या संसर्गापासून आपण दूर राहू शकाल,’ अशा आशयाचे फलक लावुन सामाजिक भान ठेवून मंडळाच्या वतीने दुर्गोउत्सव हा सामाजिक उपक्रम राबबुन साजरा केला जात आहे मंडळांचे अध्यक्ष रितेश गिरणाळे उपाध्यक्ष सुरेश सहारे व्यवस्थापक टिनु उर्फ सुमीत गावडे सदस्य गोपाल गावडे राजेश सहारे सोपान चूके जयसिंग नळकांडे आदी मंडळाचे आजी माजी पदाधिकारी या उपक्रमात सहभागी होवुन जनजागृती वर भर देत आहेत.
((मंडळाच्या वतीने दरवर्षी गितगायन स्पर्धा सह विविध स्पर्धा विविध स्वच्छता अभियान सामाजिक उपक्रम राबबुन दुर्गाउत्सव साजरा केला जातो त्याचा प्रमाणे यावर्षी अत्यत साध्यापद्धतीने आरतीपुजा करुन मंडळाचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कोरोणा विषयी जनजागृती
विषयी कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
रितेश गिरणाळे
अध्यक्ष सर्वोदय दुर्गोत्सव मंडळ गोरलेपुरा)