दीपक तायडे शासन मान्य राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुकाच्या अध्यक्ष पदी …

167

विदर्भ वतन न्यूज़ पोर्टल, प्रतिनिधी : प्रमोद निर्मळ अमरावती
अचलपूर तालुक्यात तसेच मेलघाट क्षेत्रात सुपरिचित असलेले सुस्वभावी चांगल्या व्यक्तिमत्वाचे व विनोदी भाषाशैली अवगत असलेले श्री दीपक तायडे, यांची पत्रकार संघाने कार्याची माहिती घेऊन त्यांनी कोरोना काळात, स्वतःचे परवा न करता ते जनसेवा करण्यात नेहमी व्यस्त असल्याचे पाहून त्यांचे व मेळघाट परिसरात करीत असलेले कार्य पाहून, शासन मान्यता संघ, (राष्ट्रीय) विश्वगामी पत्रकार संघाचे, राष्ट्रीय अध्यक्ष श्री संतोष निकम व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती जिल्ह्याचे विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुबोधजी मोहोड यांनी श्री दीपक तायडे यांची अचलपुर तालुक्याच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देऊन गौरविण्यात आले.
वरील विषयाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती अशी की दिनांक 19 ऑक्टोंबर 2020 रोजी. दिपक तायडे यांची राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघा च्या अचलपुर तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दिपक तायडे यांना 2004 यावर्षी चिखलदरा याठिकाणी अखिल भारतीय पत्रकार संघाचे दोन दिवसीय शिबिर असतांना त्यांना उत्कृष्टरीत्या शिबिरार्थी म्हनुन त्यामध्ये सुद्धा यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते, तसेच यांनी या अगोदर पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी पाच वर्ष अंजनगाव सुर्जी येथील तालुक्यामध्ये हिंदी वृत्तपत्रा चे कार्यालय प्रमुख म्हणून कार्य केले तेव्हा सुद्धा त्यांना उपेक्षित भारत जन आघाडी संघटनेद्वारे दिनांक 13 .9. 2003 रोजी ध्वज निर्माण दिनानिमित्त यांना वृत्तपत्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गौरव प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता. या अगोदर यांनी मराठी दैनिकाचे वार्ताहरशिप केली तेव्हा, त्यांनी आपल्या केलेल्या लेखनशैलीने आणि मेलघाट तालुक्यातील ऐतिहासिक माहिती गोळा करून परिसरातील जनतेला अचलपूर तालुक्याचे ऐतिहासिक इतिहास व तसेच चिखलदरा येथील ऐतिहासिक माहिती व मुक्तागिरी येथील माहिती त्यांनी मराठी दैनिकां मार्फत लोकांना वाचनास उपलब्ध करून दिली.त्यांनी स्थानिक गावामध्ये कोरोना व्हायरसला अटकाव म्हनुन कोरोना जनजागृतीत शासनाचे गावात विविध शिबिरे घेऊन जनजागृती केली. त्त्यांची सतत उत्कृष्ट लेखन शैली व ऐतिहासिक माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे लोकांना दिल्याचे पाहून त्यांना शांतिदूत मानव सेवा संघ अमरावती यांच्याद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषन पुरस्कार व संत कबीर कवीराज पुरस्कार मिळाला यांनी
फुले आंबेडकरी चळवळीमध्ये आपल्या लेखणीद्वारे समाजप्रबोधनाचे उल्लेखनीय कार्य केल्याने यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यांनी त्यांच्या रहिवाशी गावांमध्ये शैक्षनिक कार्य व सेवा म्हनुन अचलपुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मल्हारा याठिकाणी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपद दोन वेळा भुषविले. तसेच ते सध्यास्थितीमध्ये अध्ययन समाचार चे संपादक श्री जितेंद्रजी रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अचलपूर तालुक्यात व मेळघाट परिसरात पत्रकारितेच्या माध्यमातून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसच्या संक्रमनाच्या काळातही आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध व नावलोकीकात असलेल्या अध्ययन समाचार या प्रसिद्धी माध्यमांद्वारे निस्वार्थपने जनसेवेचे कार्य करीत असल्याने त्यांचे असे उल्लेखनीय कार्य पाहून त्यांची तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याने त्यांचे परिसरातील जनतेत व ग्रामिन व शहरी पत्रकार संघामध्ये त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केल्या जात आहे.