अविश्वास ठराव नियमबाह्य – ग्रा. प. गोर्रे येथील प्रकार

229

विदर्भ वतन न्युज पोर्टल, खोटी माहिती पसरवून प्रतिमा मलिन करण्याचा डाव – सरपंच अनिता ठाकरे यांचा आरोप

प्रतिनिधी/ सालेकसा

ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप लावून अविश्वास ठराव पारित केला असल्याची ही सर्व माहिती खोटी आहे. ग्राम पंचायत सदस्य माझ्यावर कोणत्याही प्रकारचे अविश्वास आणू सकत नाही, मी पंचायत राज मधून निवडलेली सरपंच आहे माझ्यावर गावातील जनता अविश्वास आणू शकते.असे ग्राम पंचायत सरपंच अनिता ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ग्वाही दिली.

पंचायत समिती सालेकसा अंतर्गत ग्रामपंचायत गोर्रे येथे 13 ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयचे अधिकारी निवृत्ती उईके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामपंचायत चे उपस्थित सदस्यांच्या नुसार सरपंच अनिता ठाकरे यांच्यावर विविध कार्यांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्यात आले होते. या विषयाला घेऊन सरपंच अनिता ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अविश्वास ठरावाच्या बाबत ग्रामपंचायत सदस्य द्वारे लावलेली तक्रार खोटी आहे हे जाहीर केले. परिषदेत बोलताना सांगितले की ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2017 मध्ये पंचायत राज असून जनतेच्या सत्ता अधिकाराने निवडून आले होते. त्यामुळे अविश्वासाच्या सर्वाधिकार माझ्यावर गावातील जनतेचाच आहे असेही ते बोलले. विशेष म्हणजे सदस्यांच्या अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने का अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते व त्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गावकर्‍यांची सभा बोलावून गुप्त मतदानाने गावकऱ्यांना अविश्वास सादर करावे लागते परंतु असले कुठलेही नियमाचे पालन न करता सरसकट सदस्यांच्या अविश्वास आला ग्राह्य धरून सरपंच यांना नोटीस पाठवणे कितपत योग्य आहे हे नोंद करण्यासारखी बाब आहे.

स्थानिक गावकरी आणि आणि शासकीय कर्मचारी पदावर कार्यरत विजय बिसेन यांच्यावर आरोप केला असून ते ग्रामपंचायत सदस्यांना जुन्या शासन निर्णयानुसार माहिती देऊन माझ्याविरुद्ध सदस्यांना भडकवण्यात आले आहे. सदर गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न यांनी केला असून वाईट शब्द शिवीगाळ केले आहे असाही आरोप ठाकरे यांनी परिषदेत व्यक्त केला.

पंचायतराज अधिनियमानुसार ग्रामपंचायत यांच्यावर अविश्वास सादर करण्याचा सर्वाधिकार हा गावातील जनतेला असतो. परंतु तसली कुठलीही कार्यवाही न करता सरसकट सदस्यांच्या विश्वासाला मान्यता देऊन सरपंच यांना नोटीस बजावण्यात आले आहेत. सदर अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर शासकीय दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी अशीही मागणी ठाकरे यांनी केली आहे.