सरकारचा माण तालुक्यासाठी हिरवा कंदील- दादासाहेब काळे

1030

विदर्भ वतन न्युज पोर्टल, सातारा जिल्हा प्रतिनिधी | 

अतुल धनदास खरात

माण तालुक्यात परतीच्या पावसाने खूप शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे त्यामध्ये द्राक्षे डाळींब बाजरी ऊस यासारख्या अनेक पीकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे.
या नुकसानाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यमंत्री विश्वजीत कदम साहेब. देवापुर ,पळसावडे ,या ठिकाणी पावसामुळे झालेल्या शेतीचे नुसकान पाहणी करताना. झालेल्या नुसकान भरपाई साठी महाविकास आघाडी सरकार नेहमी अग्रेसर आहे नुकसान भरपाई देण्यासाठी 100% पावले उचलत आहे व शेतकऱ्यांना नुसकान भरपाई मिळणार. आसे या ठिकाणी बोलत होते शेतकऱ्याने धीर सोडू नये शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाविकासआघाडी हे सरकार आहे. तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती गंभीर दिसत आहे या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे.या ठिकाणी सांगतो नुकसान भरपाईचा निर्णय लवकरात लवकर होईल.
याच बरोबर प्रदेश युवक काँग्रेस सचिव दादासाहेब काळे ,व सातारा जिल्हा कॉग्रेस अध्यक्ष .सुरेश जाधव ,व सोमनाथ भोसले ,विजय धट मा नगराध्यक्ष .सागर सांवत पंकज पोळ ,अखिल काझी, श्रीरंग शेंडगे सरपंच शंकर बाबर विकास गोंजारी बाबुराव माने व शेतकरी उपस्थित होते.