Home Breaking News खोलापूर येथे कार व दुचाकी अपघातात दोघाचा मृत्यू

खोलापूर येथे कार व दुचाकी अपघातात दोघाचा मृत्यू

88 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपुर

प्रमोद निर्मळ,अमरावती भरधाव जाणाऱ्या स्वीफ्ट डिझायर कार व दुचाकी अपघातात शिंगणापूर येथील दोघांचा मृत्यू झाला आहे हि घटना आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली
खोलापूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंगणापूर येथील रवि श्रीकांत इंगळे व बापुराव इंगळे हे दोघेजण खोलापूरवरुन शिंगणापूरकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला MH 27, AR 7607 या क्रमांकाच्या स्वीफ्ट डिझायरच्या कार चालकाने जोरदार धडक दिली या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी खोलापूर पोलिसांनी स्वीफ्ट डिझायर कारचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.