Home Breaking News अवघ्या १६ गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

अवघ्या १६ गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

0
अवघ्या १६ गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपुर.

प्रमोद निर्मळ अमरावती

मेळघाट च्या पायथ्याशी असलेल्या मौजा गोडवाघोली येथे असलेल्या शेतात पथ्रोट येथील युवा शेतकरी शिवाजी कुसुमाकर हरणे यांनी १६गुंठ्यात मिरची लागवडीतून १ लाखाचे वर उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता पाचव्या तोड्यातच एक लाख रूपयांची मिरची झाली आहे या नंतरच्या तोडणीतही दीड ते दोन लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा शिवाजी हरणे यांनी व्यक्त केली आहे. एकूण ३०एकर जमीन आहे. त्यामध्ये ते सत्रा तीन एकर असुन तुर, कपासी, ही पारंपरिक पिके घेत आले. पाच वर्षांपासून कधी अस्मानी, तर कधी सुल्तानी संकटाने प्रचंड तोटा सहन करावा लागला. यातून उत्पादन खर्चही हाती येत नसल्याने त्यांनी मिरची लागवड करायचे ठरवले.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी अंकुर ९३० या वाणाचे बियाणे आणून सरी पद्धतीने मिरचीची रोपे तयार केली. उन्हापासून संरक्षणासाठी साड्यांची सावली केली. वाफ्यांना झरीने पाणी दिले. मृग नक्षत्रात ५ बाय दोन फुटावर लागवड केली. लागवडीनंतर १०:२६:२६ व युरिया खताचे चार डोस केले. तीन ते चार वेळा ट्रेसर या नैसर्गिक कीटकनाशकाची फवारणी केली. आॅगस्ट महिन्यापासून मिरची तोडणी सुरू झाली. सप्टेंबर महिन्यापासून दहा दिवसाला ५ ते ६ क्विंटल मिरची निघत आहे. अंजनगाव सुजी च्या बाजारात कधी स्वत:, तर कधी ठोक व्यापाऱ्यांना मिरची विक्री करतात. कधी जास्त मिरची निघाली, तर अंजनगाव सुजी च्या व्यापाऱ्यांना ठोक विक्री करतात. मिरचीचा रंग आकर्षक असल्याने त्यांना सध्या ५० ते ५५ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. सर्व खर्च वजा जाता आतापर्यंत १ लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्यांना मिळाले आहे. शेवटच्या तोडणीअखेर दीड ते दोन लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शिवाजी हरणे यांनी व्यक्त केली आहे.यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सत्रा, कापूस या पिकांतून उत्पादन खर्चही निघण्याची आशा कमी आहे. पीक पद्धतीत बदल केला नसता, तर प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलो असतो, असेही शिवाजी हरणे यांनी सांगितले. शिवाजी हरणे हे शेतीत दरवर्षी नवनवीन प्रयोग करीत गेले. मागील वर्षी हळद लागवड १६ गुठ्ठे मध्ये केली होती त्यामध्ये दििड लाख रुपयांचे उत्पन्नन घेतले होते नवनवीन प्रयोगातून भरपूर अनुभव आला. कुठल्या पिकाला कोणती खते, कोणत्या वेळी कोणती सूक्ष्म पोषकद्रव्यांची गरज असते याची माहिती असल्याने उत्पादनातही भरपूर वाढ झाली. परिसर दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. अशा स्थितीत सहामाही पिकेच घेता येतात. सहामाही पिकांमध्ये मिरची हे पीकह फायदेशीर असल्याने या पिकाची निवडb केली. सिंचनासाठी बोरवेल ची व्यवस्था आहे. असुन सातपुड्याच्या पायथ्याशी गोंड वाघोलीी मौजा शेतशिवारात हे शेेत असुन लाल माती ची जमीन आहे ही जमीन मौजा पथ्रोट भाग एक भाग दोन पेक्षा हलकी असुन सुद्धा शिवाजी हरणे या शेतकऱ्यांनी मिरची या पिकाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे पीक घेऊन परिसरात शेती उत्पन्नात अलौकिक ठसा उमटविला आहे

((मीरचीची लागवड मे महिन्यात केली जाते आगष्ट महिण्या अखेर पासून मिरची उत्पादन सुरू होते. सुरुवातीला मिरची विक्रीसाठी मला अंजनगाव सुर्जी बाजारात जावे लागत होते. आता मात्र मिरचीची गुणवत्ता आणि दर्जा पाहून व्यापारी स्वत: फोन द्वारे मागणी करतात, शिवाजी हरणे शेतकरी))

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here