अकोला रेल्वे स्थानक सौंदर्यीकरणा अंतर्गत ‘शकुंतला रेल्वेच्या’ इंजिनची केंद्रीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते स्थापना

240

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपुर.


अकोला रेल्वे स्थानकावर १२० फूट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण

नागपूर/अकोला – अकोला रेल्वे स्थानक सौंदर्यीकरणा अंतर्गत 1911 मध्ये सुरू झालेली ‘शकुंतला रेल्वेच्या’ इंजिनची स्थापना आज केंद्रीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आली . अकोला रेल्वे स्थानकाचा एक आदर्श रेल्वे स्थानक म्हणून आधीच नावलौकीक होता, आता पुर्व विदर्भातील खेड्याच्या नॅरोगेज वरून चालणा-या ब्रिटीशकालीन रेल्वे ‘शंकुतला’ च्या इंजिनची प्रतिकृती स्थापन झाल्याने अकोला रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणात भर पडली असल्याचे प्रतिपादन धोत्रे यांनी यावेळी केल. याप्रसंगी भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक विवेक गुप्ता, आमदार गोवर्धन शर्मा ,रणधीर सावरकर , महापौर अर्चना मसने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर ,उपस्थित होते .

शंकूतला रेल्वे ही ब्रिटीश काळापासून अकोल्यातील काही खेड्यांसोबतच मुर्तिजापूर सारख्या गावांमधील कापूस उत्पादक शेतक-यांच्या आस्थेचा विषय होता.या रेल्वेच्या इंजिनची स्थापना अकोल्यात करण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल संजय धोत्रे यांनी रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले. अकोला रेल्वे स्थानकावर सरकते जीने (एस्कलेटर्स) , पादचारी पुल (एफ.ओ.बी.) स्थापन करण्यात आले असून या कामामूळे एक आदर्श रेल्वे स्थानक म्हणून उदयास आले असल्याचे धोत्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी १२० फूट उंच राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहणही अकोला रेल्वे स्थानकावर त्यांच्या हस्ते करण्यात आले. रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरणात हा ध्वज दिमाखाने फडकत असल्याची भावना धोत्रे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाला स्थानिक लोक्प्रतिनीधी , रेल्वे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.