सोयाबीनला फुटले कोंब ज्वारीला पडले डाग तर कपाशीचे सडले बोंड, शेतकरी आला रडकुंडीला

288

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपुर.

 

प्रमोद निर्मळ अमरावती
अवकाळी पावसामुळे अचलपूर तालुक्यात असलेल्या भागात मोठी हानी झाली असून खरीप पीके हातची गेली आहेत. ज्वारी, सोयाबीन, आदी पिकांना शेतातच कोंब फुटले असून कपाशीची संपूर्ण फुलगळ झाली असून कपाशीचे बोंड सडत असून काळी पडत आहे. हिरव्यागार झाडांना आता बोंडाचा बहरच येणार नसल्याने कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून त्याला तातडीने भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातून होत आहे.

तालुक्यात झालेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी रतोतोडीला आला असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. सोगणीला आलेल्या सोयाबीन आणि शेतात शेतात डौलाने उभ्या असलेल्या कपाशीचे या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुसळधार पावसाने सोयाबीन कापूस शेतातच ठेवल्याने ते पुर्णता भिजले आहे सततच्या पावसामुळे काही शेतकऱ्यांचे सोयाबीन पुर्णता सडल्याने हाती एक दानाही सोयाबीन चा घरात आला नाही. तर काही शेतकऱ्या च्या सोयाबीन ला कोंब फुटु लागले आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे पांढरे सोने म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कपाशीलाही फटका बसला आहे सितादहीवर आलेल्या कापसाची बोंडे सडु लागले असुन अनेक ठिकाणी ती गळाल्याची चित्र पहायला मिळाले. त्यामुळे कपाशी च्या उत्पन्नावरही परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाने ज्वारी सूद्धा काळी पडुन तर काही ठिकाणच्या शेतशिवारामध्ये ज्वारीच्या कणसावर कोंब फुटु लागले असुन ज्वारीची कणसे काळी पडत आहे. संत्रा उत्पादकही संत्रा गळतीमुळे हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने व्यापारी मातीमोल भावाने संत्र्याची खरेदी करत आहे. शेतकऱ्यांना परवडत नसले तरी नाईलाज म्हणून गळतीच्या व अवकाळी पाऊसाच्या भीतीने विक्री करत आहे. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला असुन ऐनदिवाळीच्या तोंडावर त्यांच्या डोळ्यातुन अश्रु वाहु लागले आहे.
((प्रत्यक्ष शेतकल्याच्या बाधावर जावुन अवकाळी पावसामुळे शेतकऱ्या च्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने काही क्षणातच हिसकावून घेतला आणि वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले हे प्रत्यक्ष परिस्थिती पाहूनच कळलं शेतकल्याच्या डोळ्यातुन अश्रू वाहत होते. शेतकर्‍यांना भरघोस मदत मिळावी याकरिता शासनस्तरावर प्रयत्न करून लवकरात लवकर मदतीसाठी पाठपुरावा करुन मा शरद पवार खा सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा कळविणार आहे
सौ संगिता अनिल ठाकरे
जिल्हा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ))