
विदर्भ वतन न्युज पोर्टल,
सेवासदन शिक्षण संस्था ही नागपूरच्या हृदयस्थानी शहराच्या मध्यभागी वसलेली संस्था आहे . ही संस्था 1927 साली नागपुरात उदयास आली.संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टिकोनातून मोलाचे मार्गदर्शन करीत असते. राष्ट्रीय स्तरावर अभियांत्रिकी प्रवेशाकरिता परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत नुकत्याच झालेल्या जेईई ॲडव्हान्स 2020 चा निकाल ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित करण्यात आला. यामध्ये सेवासदन कनिष्ठ महाविद्याल यातील सीताबर्डी येथील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थी.यांचा आज सत्कार आणि कौतुक करण्यात आले.
- आदित्य अनिल कडू (AIR 112,OBC-NCL 8)
2. प्रेरक सुनील मेश्राम (AIR 535,SC NCL 07)
3 . स्थविर मुंद्रे (AIR 653,SC NCL 09)
4 . अर्णव बोरकर (AIR 3388)
5 . रोहन नाकाडे (AIR 3801)
6 . पार्थ खंडेनाथ (AIR 5114)
7. अभिषेक बन्सोड (AIR 5114)
8 . हर्षल कोट्टी (AIR 20146)
9 . यश बन्सोड (AIR 25184)
याशिवाय अर्चित मंडपे शाष्वत मिश्रा व विनय सोनकुसरे या सर्व विद्यार्थ्यांचे विश्वस्तरीय ख्यातीप्राप्त अश्या भारतीय तंत्रज्ञान संस्था व राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, आय आय टी मध्ये प्रवेश निश्चित झाले आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी, शुक्रवारला सेवासदन संस्थेच्या सभागृहात या गुणवंत विद्यार्थ्यांचा छोटेखानी अभिनंदन सोहळा घेण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. कांचनताई गडकरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या पालकांचा व शिक्षकांचा, विद्यार्थ्यांच्या, शैक्षणिक आयुष्यात महत्त्वाचा वाटा असतो असे त्यांनी सांगितले. तसेच प्रदेशात जाऊन शिक्षण घेतल्यानंतर आपल्या भारत देशासाठी संशोधन करून स्वतःचं, पालकांचं, शिक्षकांचं, पर्यायाने देशाचे नाव उज्ज्वल करा. असा मोलाचा कानमंत्र दिला. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. यात आदित्य कडू यांचे पालक अनिल कडू यांनी सर्व पदाधिकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कडून मिळणाऱ्या मदतीचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांच्या आईने श्रीमती सुनीता मुंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले की, विद्यार्थ्यांनी लक्ष विचलित न करता आत्मविश्वासाने सगळ्यांना तोंड देत कसे मिळवायचे हे सांगितले. तसेच वेळोवेळी मिळणाऱ्या संस्थेच्या व शिक्षकांच्या मदतीची आभार मानले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सेवासदन संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी, उपाध्यक्ष बापूसाहेब भागवत, मा. बन्सोड, सचिव इंदुबाला मुकेवर, सहसचिव नानासाहेब आकरे, वंदन मोहरील कार्यकारी अधिकारी बाळकृष्ण सुरतणे, मुख्याध्यापक निरंजन कुंभलकर कनिष्ठ महाविद्यालय, पर्य वेक्षिका वृषाली सवनकर तसेच वर्ग शिक्षक बाळकृष्ण गड्डमवार यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा राऊत यांनी केले. तसेच आभार ही मानले. कार्यक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेचे सर्व प्राध्यापक तसेच कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.

