ओएमजी वर्ल्ड रेकॉर्ड बुकच्या निरीक्षकपदी

379

डॉ. दत्ता विघावे यांची निवड

विदर्भ  वतन न्युज पोर्टल, अक्षय तेलोरे श्रीरामपूर, अहमद नगर जिल्हा प्रतिनिधी : – जेष्ठ क्रिकेट पंच, प्रशिक्षक व समिक्षक डॉ. दत्ता विघावे यांची विश्वविक्रमांची नोंद ठेवणाऱ्या “ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड” च्या निरीक्षकपदी निवड झाले असून त्या अशयाचे पत्र डॉ. दत्ता विघावे यांना नुकतेच ओएमजी वर्ल्ड रेकॉर्ड बुक तर्फे देण्यात आले आहे.

डॉ. दत्ता विघावे हे विश्वशांतीदूत असून युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुलचे सदस्य असून ” वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) चे म्हणजे जागतिक संविधान व संसदीय संघाचे महाराष्ट्र चॅप्टर ( श्रीरामपूरचे )अध्यक्ष तसेच डब्ल्यूसीपीएचे राष्ट्रीय मिडीया को- ऑर्डीनेटर आहेत.

क्रिकेटमध्ये डॉ. दत्ता विघावे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट (पीएचडी) ही मानद पदवी बहाल केली आहे.

एक क्रिकेट समिक्षक म्हणून डॉ. दत्ता विघावे यांचे अकरा हजारापेक्षा जास्त लेख विविध प्रचार व प्रसार माध्यमातून प्रसिध्द झाले आहेत. क्रिकेट स्तंभलेखक म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत.

‘                     माहितीचा खजाना असलेल्या गुगलकडेही नसलेली क्रिकेट संदर्भातील काही माहिती डॉ. दत्ता विघावे यांच्या लेखणीतून प्रकट झाली. त्यांचे लेख गुगलने त्यांच्या फोटोसह अपलोड केले आहेत.

डॉ.दत्ता विघावे यांच्या माध्यमातून आता ग्रामीण भागात वेगवेगळ्या क्षेत्रात विक्रमी कामगिरी करणाऱ्या लोकांना आपले कलागुण ओएमजी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत पोहचविण्यास मदत होईल.

डॉ.दत्ता विघावे यांच्या निवडीचे समाजातील विविध स्तरातून कौतुक होत असून वर्ल्ड पार्लमेंटकडून सचिव भाऊराव माळी, कोषाध्यक्ष प्रा. शैलेंद्र भणगे, जेष्ठ सदस्य व आरोग्य मित्र भिमराज बागुल, सी.के. भोसले, अमोल राखपसरे, बाबासाहेब वाकचौरे, सल्लागार समितीचे अनिलराव पाटोळे, विष्णू लबडे, पत्रकार राजेंद्र देसाई, गणेश बोरसे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.