प्रतिनिधी: स्वप्नील सरडे, वर्धा

204

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपुर

सध्या हिंगणघाट शहरात सर्वत्र विकासाचे व सौंदर्यकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कामाचा दर्जा व कामाच्या प्रगतीबाबत मा. कार्यसम्राट आमदार समीरभाऊ कुणावर यांनी आज दिनांक १६/१०/२०२० ला निशानपुरा वार्डातील मुख्य रस्त्याची व नाल्याची पाहणी केली. सोबत स्मशानभूमी चे विकास काम व सौंदर्यकरण संदर्भात पाहणी करून वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा उड्डाणपूल ची पाहणी करून १ महिन्याच्या आत पुलाचे संपूर्णपणे काम करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. धमाने साहेब, पोफळे साहेब यांना दिले. सोबतच स्मशानभूमीचा मुख्य रोड चे काम व रुंदीकरण चे काम लवकरात-लवकर करण्याचे आदेश बांधकाम विभागाला देण्यात आले. सोबतच शहरातील जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन जनतेच्या समस्या सोडविल्या. सोबत अमृत योजने संबंधित अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोफळे साहेब, धमाने साहेब, राजेश कुबडे साहेब, ठेकेदार मोहम्मद शेख व श्री चंदनखेडे, वर्धा जिल्हा भाजपा महामंत्री किशोर भाऊ दिघे, भाजयुमो चे प्रदेश सचिव अंकुशभाऊ ठाकूर, नगरसेवक चंदूभाऊ माळवे, कार्यकर्ते राजूभाऊ गंधारे, बालूभाऊ वानखेडे, संदीपभाऊ सुरकार इत्यादी कार्यकर्ते पाहणी करते वेळी पायदळ सोबत होते.