
विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल: नागपूर प्रतिनिधी. नागपूर: मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्य सरचिटणीस रिटाताई गुप्ता, यांच्या मार्गदर्शना खाली दक्षिण विभाग क्षेत्र वार्ड नं. 32 येथे नागपूर उपशहर अध्यक्षा कल्पना ताई चौहान यांच्या नेतृत्वात महिलांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी नागपूर शहर अध्यक्षा संगिता सोनटक्के आणि अचला ताई मेसन या उपस्थित होत्या. मनसे कार्यकत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.

