साईबांबाच्या समाधी दिना निमित्त महाप्रसादाचे भव्य आयोजन

सविस्तर बातमीसाठी 👇🏻👇🏻 https://www.vidarbhawatan.com/news/5360 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

252

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल : नागपूर प्रतिनिधी – श्री साईबाबा श्रद्धा सबुरी सेवा संस्थान नागपूर, साईदूत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 15 ऑक्टोबर 2020 रोजी श्री साईबाबांच्या समाधी दिना निमित्त सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचा शेकोडो भक्तांनी लाभ घेतला. वर्धा रोड साई मंदिराच्या बाहेर रोडवरील महाप्रसादाचा मोठ्या उत्साहाने साईभक्तांनी आनंद घेतला. त्यापुर्वी साईबाबा च्या प्रतिमेची पूजा आरती करून नंतर महाप्रसादाला सुरवात करण्यात आली. नागपुरातील साई भक्तांनी बाहेरूनच साईबाबांचे दर्शन घेउन पुरी, भाजी, आणि सोनपापडी अशा प्रकारे महाप्रसादाचा लाभ घेतला. अनेक साईभक्तांनी या महाप्रसादाच्या कार्यक्रमात आपली सेवा दिली. श्री. साईबाबा श्रद्धा सबुरी सेवा संस्थानचे सचिव साईदूत अनुप मुरतकर यांनी हि माहिती प्रसिद्धीपत्रकात दिली. जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव विशेष म्हणजे इ. सन. 1918 मध्ये 15 ऑक्टोबर या रोजी हिंदू चा दसरा, मुस्लिमांचा रमजान चा नववा दिवस आणि त्याच दिवशी एकादशी होती. याच दिवशी दुपारी साईबाबांनी दोन वाजून वीस 2ः20 मिनिटांनी समाधी घेतली होती हे विशेष आहे.