Home Breaking News वाडी अनुयायी यांच्या समवेत धम्मचक्र व डिफेन्स येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन...

वाडी अनुयायी यांच्या समवेत धम्मचक्र व डिफेन्स येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा

86 views
0

अमित हुसनापुरे, विदर्भ वतन प्रतिनिधी – वाडी :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखोप्रवर्तन केले आज ६४ वर्षे पुर्ण झालेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अगरबत्ती व मेणबत्ती लावुन सामुहीक बुद्धवंदना घेण्यात आली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागवंशीयाच्या भुमीत लाखो दिन दलित अनुयायी यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म देत अशोका विजया दशमीला नागपुरातील पवित्र दिक्षा भुमीवर धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. या कार्यक्रमा प्रसंगी सामाजिक अंतर ठेवून कार्यक्रम साजरा करण्यात आला
डिफेन्स – या प्रसंगी गुड़डु लावत्रे यांनी महा मानव डॉ. बाबासाहेबांच्या कार्य सिध्दीवर प्रकाश टाकुन त्यांना महीमामंडीत केले. या कार्मक्रमात गुड्डु लावत्रे , रोशन गणविर, शैलेश मानकर, विनोद मानकर ‘नितीन साखरें अरुण वासनिक ईत्यादि मान्यवर उपस्थित होते.
वाडी- धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादीचे सामाजीक न्याय जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे , प्रा . सुरेंद्र मोरे , राजू खोब्रागडे , योगेश चरडे , ललित डहाट , ईश्वर चव्हाण , संतोष नंदागवळी , सुनील सेलोकर , लाल भैय्या , दहीवले , रुतीक दोरशटवार , सामाजीक कार्यकर्त्या उज्वला नरवाडे , किशोर नरवाडे , राहुल मेश्राम , आयुश नरवाडे उपस्थित होते.