Home अमरावती ग्राम विकासाला नरेगाची जोड दिल्यास ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होईल — आमदार...

ग्राम विकासाला नरेगाची जोड दिल्यास ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होईल — आमदार देवेंद्र भुयार

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/5340 *या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

192 views
0

विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल: वरुड तालुका प्रतिनिधी – राहूल नागपूरे-

वरुड : पुणे येथे आमदार देवेंद्र भुयार, आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत मोर्शी विधानसभा मतदार संघातील वरुड मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादन तंत्रज्ञान, ठिंबक तुषार अनुदान, रोजगार हमी योजना, प्रक्रिया प्रकल्प, संदर्भात कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी विदर्भातील संत्रा पिकाबद्दल आपली भूमिका मांडुन संत्रा उत्पादक शेतक-यांच्या समस्या सोडविण्याची मागणी केली.
शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार आमदार रोहित पवार या दोन्ही युवा आमदारांनी एकत्र येऊन प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतील २५ टक्के व ३० टक्के अनुदान शेतक-यांना उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त पुणे यांची बैठक घेतली.
वरूड मोर्शी तालुका विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असून येथील शेतक-यांनी मोठया प्रमाणात प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत ठिबक व तुषार योजनेचा लाभ घेतला.  सन.२०१९-२० मध्ये मोर्शी वरूड तालुक्यात जवळपास १५०० शेतक-यांनी प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजने अंतर्गत ठिबक व तुषार संचाचा लाभ घेतला मात्र शेतक-यांना अल्प, अत्यल्प, एस.सी.एस.टी शेतक-यांना फक्त ५५ टक्के व मोठया शेतक-यांना ४५ टक्के प्रमाणे अनुदान मिळाले आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेतील सुक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत अल्प, अत्यल्प, एस.सी.एस.टी शेतक-यांना ५५ टक्के अनुदानास २५ टक्के पुरक अनुदान देवून ८० टक्के अनुदान देण्यात यावे व इतर शेतक.यांना ५ हेक्टरचे मर्यादीत ४५ टक्के अनुदानास ३० टक्के पुरक अनुदान देवून ७५ टक्के अनुदान अनुदान तात्काळ उपलब्ध करून देण्या संदर्भात कृषी आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन शेतक-च्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली तसेच मोर्शी वरुड तालुक्यातील अत्यावश्यक विकास कामे २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात अंतर्भूत करून कृषी विभागांतर्गत वरुड कृषी कार्यालय भाडेतत्वावर असून तेथे कृषी भवन कार्यालय इमारत बांधकामाकरीता निधीची तदतूद करण्यात यावी. तसेच मोर्शी कृषी कार्यालय इमारत बांधकामाकरीता निधीची तरतूद करण्यात यावी. तसेच विदर्भातील मुख्य फळपिक संत्रा असून सुमारे १,२५,००० हेक्टर संत्रा लागवडीखाली क्षेत्र असून सुमारे १८,००० पेक्षा जास्त शेतक-यांचा उदरनिर्वाह या पिकावर अवलंबून आहे. परंतू अमरावती जिल्ह्यातील मुख्य फळपिक संत्रा असून राज्याच्या तुलनेत ५० टक्के ;८७ हजार हेक्टर, क्षेत्र हे एकट्या अमरावती जिल्ह्यातील आहे. वरुड मोर्शी तालुका संत्र्याचा कॅलिफोर्निया म्हणून सुपरिचीत असून वरुड मोर्शी तालुक्याचे संत्रा लागवडीखालील क्षेत्र ४२ हजार हेक्टर आहे त्यामुळे नागपुरी संत्रावर प्रक्रिया होणारा प्रकल्प वरुड मोर्शी तालुक्यात उभारण्याकरिता कृषी आयुक्त यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.
मोर्शी वरुड मतदारसंघात अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे. शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत करून ग्राम विकासाला नरेगाची जोड देऊन ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली त्यावेळी आमदार देवेंद्र भुयार आमदार रोहित पवार, कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.